भवानी पेठेत 'होप हॉस्पिटल'ची मोफत ऑनलाइन ओपीडी*  ------------------------------------ *'होप ऑन व्हील्स' द्वारे घरपोच चाचण्यांची सेवा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट                                                                                                                               *भवानी पेठेत 'होप हॉस्पिटल'ची मोफत ऑनलाइन ओपीडी* 
------------------------------------
*'होप ऑन व्हील्स' द्वारे घरपोच चाचण्यांची सेवा*                                                                                             ------------------                                                                                                               *चार ठिकाणी 'एरिया क्लिनिक 'द्वारे रुग्णसेवा* 
पुणे:


कोरोना लॉकडाऊन काळात अनेक डॉक्टर मंडळींनी दवाखाने बंद ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना चा पुण्यातील हॉट स्पॉट असलेल्या भवानी पेठेत 'होप हॉस्पिटल 'ने  मोफत 'ऑन लाईन ओपीडी क्लिनिक' वैद्यकीय सेवा सुरु करून रुग्णांचे आशीर्वाद मिळवले आहेत. वेगळी फ्लू ओपीडी २२ मार्च पासूनच  सुरु केली. सामाजिक बांधिलकी मानून २० हजार मास्क चे मोफत वाटप केले. स्वतःच्या घराजवळ उपलब्ध असणाऱ्या कापड व्यावसायिकांना दुकाने  उघडायला लावून त्यांनी मास्क शिवण्याची यंत्रणा निर्माण करून या मास्क चे मोफत वाटप नजीकच्या वस्त्यांमध्ये केले. भवानी पेठ,नाना पेठ,कॅम्प ,रामोशी गेट अशा चार ठिकाणी 'एरिया क्लिनिक' सुरु करण्यात आली असून तेथेही गरजू रुग्णांना सेवा दिली जात आहे .


डॉ अमोल देवळेकर,डॉ प्रज्ञावंत देवळेकर आणि डॉ दीपा देवळेकर यांच्या होप हॉस्पिटल  मध्ये एकूण ५ डॉक्टर आणि १० जणांचा पॅरा मेडिकल स्टाफ असून कोरोना नंतर वाढलेल्या आव्हानांनिशी रुग्ण सेवा करीत आहेत.  रोज नेहमीपेक्षा अधिक वेळ काम करावे लागत असून सुरक्षित अंतर ठेवून,पीपीई  सूट घालून  रुग्ण तपासणी आणि उपचार केले जात आहेत. 


लॉक डाऊन काळात घराबाहेर पोचणे शक्य नाही ,अशा रुग्णांना ऑनलाईन ओपीडी सेवा दिली जात आहे. घरी राहून रुग्णांनी फोन ,व्हाट्स अप,व्हिडीओ कॉल द्वारे होप च्या तज्ज्ञ डॉक्टरांना संपर्क साधल्यास काही मिनिटात प्रिस्क्रिप्शन रुग्णांना पाठवले जातात. 


स्त्रियांच्या तक्रारीसाठी डॉ दीपा  देवळेकर मार्गदर्शन करीत आहेत.हृदय आणि मोठ्या विकारांबद्दल डॉ अमोल देवळेकर मार्गदर्शन करीत असून ताप आणि अनुषंगिक विकारांवर डॉ प्रज्ञावंत देवळेकर ,डॉ झिशान शेख मार्गदर्शन करीत आहेत. 


रक्त ,लघवी तपासणी सेवा करून रिपोर्ट  घरपोच देण्याचे नियोजन होप हॉस्पिटल ने केले  असून 'होप ऑन व्हील्स' ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच 'सेव्ह मेडिकल सर्व्हिस 'द्वारे घरपोच औषधे देण्याची सेवा होप हॉस्पिटल ने सुरु केली आहे.   


'होप टीव्ही' द्वारे कोरोना विषयक जनजागृती देवळेकर करीत आहेत. या विनामूल्य यू -ट्युब चॅनेल वर ते रोज कोरोना विषयक ज्ञान ,माहिती आणि बचावाचे मार्गदर्शन करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी कोरोना ची माहिती ,बचावाचे मार्ग,शारीरिक ,खासगी डॉक्टरांचा सहभाग ,मानसिक आरोग्य जपण्याविषयी मार्गदर्शन या माध्यमातून केले आहे.आज शिवेसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी या सर्व उपक्रमांना भेट देवून पाहणी केली.
 होप मेडिकेअर फाऊंडेशन तर्फे कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले असून गरजू - गणेश भक्त मंडळ- भीम जयंती मंडळ- कार्यकर्ते आदींनी सकाळी ९ ते ११ या वेळेत अन्न संकलित करून आपापल्या भागात सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून वितरित करावे.रोज १ हजार गरजूंना अन्न मोफत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . अधिक माहितीसाठी आणि आवश्यक प्रमाण कळविण्यासाठी डॉ. अमोल देवळेकर ( होप हॉस्पिटल ) आणि चांद शेख (८८८८५ ८९९९१), सत्यम सोनावणे (९७६३० ०२९२१) यांच्याशी संध्याकाळी ५ वाजेच्या आत संपर्क साधावा जेणेकरून पुढील दिवसाचे नियोजन करता येईल.                                                                        ----------------------------------------