अतिसंवेदनशील भागाची मनपा व पोलीस प्रशासनाच्या वतीने पाहणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धी करिता,
अतिसंवेदनशील भागाची मनपा व पोलीस प्रशासनाच्या वतीने पाहणी
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेतर्गत आज पुणे मनपा व पोलीस प्रशासनाच्या वतीने पर्वती दर्शन,मुकुंदनगर,गुलतेकडी,
ताडीवाला रस्ता,लक्ष्मीनगर येरवडा,पाटील इस्टेट,भवानी पेठ काशेवाडी परिसर,या परिसरातील पाहणी केली,व 
तेथील मा,सभासद,नागरिक व वॉर्ड ऑफिसर,व पोलीस अधिकारी,पोलीस निरीक्षक,यांचेशी मा,महापौर मुरलीधर मोहोळ,मा,अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल ) रुबल अगरवाल, सहपोलिस आयुक्त,संजय शिंदे,सुनील फुलारी यांनी चर्चा केली,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेतर्गत मा,महापौर यांनी सांगितले की कोरोना विषाणू लक्षणे ,संशयित रुग्ण,अशा सर्व नागरिकांची पाहणी करून त्यांना,उपचारार्थ पाठविण्याबरोबरच येथील उर्वरित नागरिकांना प्रतिबंधात्मक वैद्यकीय साहित्य पुरविणे अर्थात सॅनिटाइजेर,कापडी मास्क,औषधे जलदरीत्या वितरित करणे,व संसर्ग प्रतिबंधकरिता विलगिकरणासह, हॉस्टेल, लोजिंग, यांचाही कर्मचाऱयांकरिता वापर करणे अत्यन्त आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले,
पाहणीप्रसंगी मा,अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले की नागरिक सुविधा,व करावयाचे उपचार व  अन्य सर्व नियोजनाचे अनुषंगाने वॉर्ड ऑफिसर यांनी या परिसरातील पोलीस निरीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेशी समन्वय साधून जलदरीत्या कामे करावीत,येणाऱ्या अडचणी स्वतःच्या पातळीवर निर्णय घेउन विलंब टाळावा,परिसरातील लक्षणे असलेली रुग्ण यादी,पॉझिटिव्ह निगेटिव्ह यादी,वर्गीकरण नुसार त्यांची रुग्णालये,व निवास व्यवस्था,वाहतूक,व अन्य संपूर्ण नियोजन पोलीस अधिकारी यांच्या सहभागाने जलद पूर्तता करावी असे सांगितले,
याप्रसंगी मा,उपमहापौर सौ,सरस्वती शेंडगे,सौ,स्मिता वसते,मा,सौ,राजश्री शिळीमकर,मा,सौ,रजनी त्रिभुवन, मा, लताताई राजगुरू,पोलीस निरीक्षक श्री,शिंदे, श्री,युनूस शेख, सहमनपा आयुक्त ज्ञानेश्वर मोलक,उपायुक्त अविनाश संकपाळ,नितीन उदास,सोमनाथ बनकर,दयानंद सोनकांबळे,किशोरी शिंदे,व सुजित यादव व अन्य अधिकारी उपस्थित होते,
संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
२७/०४/२०२०,