भारतात 'कोरोना बॉम्ब' फोडण्याच्या तयारीत; नेपाळच्या राजकारण्याला अटक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


भारतात 'कोरोना बॉम्ब' फोडण्याच्या तयारीत; नेपाळच्या राजकारण्याला अटक
___________________________________


जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. यामुळे भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या शक्तींनी आता भारतात जैविक हल्ला करण्यासाठी कोरोनाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये तसा प्रयत्नही करण्यात आला आहे. असेच ४० कोरोना संदिग्ध लोकांना भारतात कोरोना पसरविण्यासाठी पाठविण्याच्या तयारीत असलेल्या जालिम मुखियाला नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे. 
या जालिम मुखियाने ४० तबलिगी जमातीच्या लोकांना आसरा दिला आहे. रक्सौल सीमेवर भारतीय जवानांनी पाकिस्तान, इंडोनेशिया आणि भारतातील काही जमातींना रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते नेपाळच्या सीमेमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाले होते. हे लोक दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी होऊन परतत होते. हे एकूण २४ जण असून यापैकी तिघांना कोराना झाला आहे. 
जालिम मुखियावर आरोप आहे की, त्याने या लोकांना आसरा दिला होता. यानंतर नेपाळ पोलिसांनी जगन्नाथपूरचा महापौर असलेल्या मुखियाला अटक केली आहे. मुखिया हा शस्त्रांची तस्करी करतो. नेपाळ सीमेवरून त्याचा हा गोरखधंदा चालतो. तो जग्रनाथपूर गावातील रहिवासी आहे. माओवाद्यांच्या एका गटातही तो सहभागी असल्याचे सांगितले जाते. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचा सदस्यही आहे. गेल्या वेळच्या नेपाळ निवडणुकीत त्याची महत्वाची भूमिका होती. त्याचे गाव हे दोन देशांच्या सीमेवर वसलेले आहे. 
हा मुखिया जरी राजकारणात असला तरीही त्याआडून तो बनावट नोटा आणि हत्यारांची तस्करी करतो. त्याचे नेपाळच्या एका मंत्र्यासोबतही लागेबांधे आहेत. याच जोरावर मुखिया भारतविरोधी कारवाया करत असतो. 
एसएसबी ने बेतियाच्या पोलिस अधिकाऱ्यांना पत्र लिहून नेपाळ सीमेवरून भारतात ४० ते ५० कोरोनाग्रस्त लोक घुसखोरी करणार आहेत. या लोकांना भारतात कोरोना व्हायरस पसरविण्यासाठी पाठविण्यात येत आहे. खासकरून बिहारमध्ये हे जैविक मानवी बॉम्ब फोडायचे आहेत. त्यांना जालिम मुखिया मदत करणार आहे, अशी सूचना केली होती. हे पत्र मीडियामध्ये आल्यानंतर खळबळ उडाल्याने बिहार सरकार आणि गृह मंत्रालयाने गंभीरतेने घेत नेपाळ सरकारला कारवाई करण्यास सांगितले होते.


Popular posts
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image