पुणे प्रवाह न्युज पोर्टल
थोड कौतुक यांचं ही व्हाव!*
*आपले बंधू वीज कर्मचारी*
नमस्कार,
गेले १५ दिवस आपण lockdown मुळे घरी बसून आहोत. Corona विरुद्धच्या लढ्यात प्रत्येक योद्ध्याच आपण कौतुक करतोय, मग ते जीवावर उदार होऊन अखंडित सेवा देणारे डॉक्टर्स असोत, नर्सेस असोत, पोलीस असोत की सफाई कर्मचारी, महानगर पालिका व जिल्हा प्रशासनाने कर्मचारी किंवा बँक कर्मचारी असोत.
मात्र या लढ्यात २४ तास काम करणाऱ्या पण कुठंही प्रत्यक्ष न दिसणाऱ्या एका अनामिकाला आपण विसरतो आहोत. तो म्हणजे वीज कंपनीचा कर्मचारी. एक MSEDCL/MSETCL/MSPGCL चा कर्मचारी (आपल्या भाषेत एम. एस. ई. बी.) MSEB च्या तिनही कंपनी (msetcl, msedcl, msegcl) चे सर्व कर्मचारी मागील 15 दिवसापासून जीवाची पर्वा न करता अखंडित विज पुरवठा करत आहेत. अत्यावश्यक सेवेत मोड़त असल्याने आणि देशाच्या अश्या आणिबाणी प्रसंगात देश सेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभले याचा त्यांना निश्चितच अभिमान आहे.
खरे पाहिले तर आज यांनी दिलेल्या अखंडित वीज सेवे मूळेच 90% लोक आज घरात बसून आहेत हे नाकारता येणार नाही. कसे....
ते पण सांगतो.
1) टीव्ही पाहताय.
2) laptop वर काम करताय
3) मोबाईल वर करमणुक करताय
4) गर्मित थंड हवा खाताय
हे सगळ यांच्या मुळ होऊ शकत, कारण घरात बसणे एवढे सोप्प नाहीच. या सर्वाना वीज लागतेच लागते.
*फक्त वीज नाही अशी कल्पनाही कोणी केली तर कोणी घरात राहुच शकणार नाही. यांना कोणाकडूनच कसलीही अपेक्षा नाही पण ज्या प्रमाणे डॉक्टर्स, पोलिस, नर्स, सफाई कामगार ; प्रशासकीय कर्मचारी यांचे कौतुक होत आहे व ते बराेबरच आहे त्याच प्रमाणे यांचेही कौतुक व्हावे एवढीच किमान अपेक्षा बाळगण्याचा त्यांचा अधिकार आहेच*.
वीज पुरवठा करताना बरीच कामे ही कंत्राटदारांच्या माणसांकडून करून घ्यावी लागतात. *यात काेराेना चा संपर्क होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या काळात मेटेन्सस ची कामेही हाती घेण्यात आल्याने कामाचा ताण वाढला आहे तो निराळाच. काही अधिकाऱ्यांना १२ - १२ तास काम करावे लागत आहे. तरीही यांची काही तक्रार नाही मात्र इतकेच यांना वाटते की *मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा*,
*पाठीवरती हात ठेवुनी तुम्ही फक्त लढ म्हणा!!*
तर या निमित्ताने त्याची पाठ थोपटून त्यांना धन्यवाद देऊयात आणि
*अखंडित वीज पुरवठा हेच आमचे ध्येय* हे वीज कंपनी चे ध्येय साध्य करण्यासाठी यांना "Thank you" म्हणून यांचा उत्साह वाढवुया. *संपादक संतोष सागवेकर,सा.पुणे प्रवाह आणि पुणे प्रवाह न्युज पोर्टल आणि सह परिवार*
* *सुनील शिरसाट उपसंपादक "साप्ताहिक लालदिवा"*