राज ठाकरे यांची मागणी चुकीची :लोकजनशक्ती पार्टी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट                                                                                                                                                                        *राज ठाकरे यांची मागणी चुकीची :लोकजनशक्ती पार्टी*
पुणे:
'महसूल वाढीच्या नावाखाली मद्य विक्री सुरु करा'अशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सूचना चुकीची असून कोरोना लॉक डाऊन काळात  अशा मागणीला विरोध राहील,असे पत्रक रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीतर्फे आज शुक्रवारी प्रसिद्धीस देण्यात आले आहे. पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट,प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे,एड.अमित दरेकर,सुरेश सहानी यांनी पत्रकाद्वारे राज ठाकरे यांच्या सूचनेला विरोध दर्शवला आहे.'शासनाकडे महसूल वाढीची अनेक साधने आणि उपाय आहेत.मद्य विक्रीकडे शासनाने महसुल प्राप्तीचा मार्ग म्हणून पाहू नये.राज्यातील गरीब जनता,मजूर,तळागाळातील कामगार यांना दररोजच्या अन्नासाठी पैसे नसताना मद्य विक्रीची दुकाने सुरु झाल्यास त्यांच्या घरी अन्नासाठी पैसेच शिल्लक राहणार नाहीत,आणि व्यसनाधीनता वाढू शकेल,असा धोका असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.सर्वांच्या दोलायमान मानसिक स्थितीचा विचार केल्यास मद्य विक्री अनेक संकटाना निमंत्रण देणारी ठरेल.अशा दुकानामध्ये वावरताना शारीरिक अंतर राहणे अशक्य आहे.राज यांनी अव्यवहार्य सूचना करून गोंधळ वाढवू नये,असेही लोकजनशक्ती पार्टीने म्हटले आहे.                                                                                    ---------------------