विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे कोरोना विषाणूबाबत प्रेसनोट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


विभागीय आयुक्त कार्यालय,पुणे
कोरोना विषाणूबाबत प्रेसनोट दि.01/04/2020
1) पुणे विभागामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज दि. 01/04/2020 ( दुपारी 2.00 वाजेपर्यत सध्यस्थीती ) रोजी एकुण 5 ने वाढ झाली असून  विभागातील एकुण रुग्ण संख्या 77 झाली आहे. ( पुणे 36, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2,सांगली 25आणि कोल्हापूर 2). तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने 1633 होते. त्यापैकी 1529 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 104 चे अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवाला पैकी 1413 नमुने निगेटीव्ह आहेत व 77 नमुने पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत 16 रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. विभागामधील 7795 प्रवाशापैकी 4276 प्रवाशांबाबत फ़ॉलोअप सुरू असून 3519 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे. आजपर्यंत 1001140 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4591191 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 382 व्यक्तीना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
2) विभागातील शासकीय रुग्णालयामध्ये एकुण PPE (Personal Protective Equipment) 2282,N 95 Mask  29600, Triple Layer Mask 193365 व 2213 वेटीलेंटर्स उपलब्ध आहे. तसेच सह आयुक्त,अन्न व औषध प्रशासन यांचेकडील माहीतीनूसार 1438 PPE (Personal Protective Equipment), N 95 Mask 20799  व 2 ply & 3 ply चे 190712 इतके mask उपलब्ध आहेत. तसेच 30  ml to  500 ml Sanitizer 128211 एवढे उपलब्ध आहेत.
3) विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा साठा 
• पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 
• 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे. 
• मार्केट मध्ये विभागात एकूण 22913 क्विंटल अन्नधान्याची अंदाजे आवक असून भाजीपाल्याची आवक 9486 क्विंटल , फळांची 16807 क्विंटल  तसेच कांदा  बटाट्याची 42971 आवक झाली आहे
विभागात  दि.31/03/2020 रोजी 92.46 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.24 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले असून उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे. तसेच अन्नधान्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचण भासल्यास संबधीत जिल्हयातील खालील अधिका-यांशी त्यांच्या नावासमोर दर्शवीलेल्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 
पुणे जिल्हा :-     1) श्री.भानूदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी  020-26061013
                         2) श्रीमती अस्मीता मोरे, अन्नधान्यवितरण अधिकारी  020-26123743
सातारा जिल्हा:- 1) श्रीमती स्नेहल किसवे, जिल्हा पुरवठा  अधिकारी  02162-234840
सांगली  जिल्हा:- 1) श्रीमती वसुधंरा बारवे, जिल्हा पुरवठा  अधिकारी  0233-2600512
कोल्हापूर जिल्हा :-1) श्री.दत्तात्रय कवीतके, जिल्हा पुरवठा  अधिकारी 0231-265579
सोलापूर जिल्हा :- 1) श्री.उत्तम पाटील, जिल्हा पुरवठा  अधिकारी  0217-2731003/8


4)  पुणे शहरातील सर्व खाजगी वैदयकीय व्यावसायिकांनी कोरोना सदृश्य परिस्थीतीत आपले दवाखाने सुरु ठेवावेत व आपल्या दवाखान्याकडे येणा-या रुग्णांना (SARI) सर्दी, खोकला, घसादुखी या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी कार्यन्वित करण्यात आले असून येथे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. संपर्क दुरध्वनी क्रमांक 020-25818323 डॉ.स्वाती बढीये (निवासी वैदयकीय अधिकारी, कै.द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल, बोपोडी ) 8806668747.
याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिकेच्या अथवा इतर खाजगी दवाखान्यांमध्ये जर कोरोनाची लक्षणे असलेला रुग्ण आढळून आला तर अशा रुग्णास यशवंतराव चव्हाण हॉस्पीटल अथवा भोसरी येथील नुतन भोसरी हॉस्पीटलमध्ये (कोरोना बाधित रुग्णांसाठी विशेष व्यवस्था असलेले) दाखल करून त्यावर पुढील उपचार करण्यात येतील. यासाठी संपर्क दुरध्वनी क्रमांक 020-67331307.
5) स्थलांतरीताकरीता तयार करण्यात आलेले रीलीफ कॅम्प :  विभागामध्ये    जिल्हा प्रशासनमार्फत  89 व साखर कारखान्यामार्फत 26 असे एकुण 115 रीलीफ कॅम्प स्थलांतरीत मजूरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये   एकुण  8199 स्थलांतरीत मजूर असून एकुण 63171 मजूरांना जेवण देण्यात येत आहे.    
0000