पुणे प्रवाह न्युज पोर्टल
उल्हासनदीमध्ये आढळला नेरळ येथील व्यक्तीचा मृतदेह
कर्जत,ता.7 गणेश पवार
नेरळ जवळील कोल्हारे येथे राहणाऱ्या मछिंद्र मारुती गवळी या व्यक्तीचा मृतदेह आंबिवली जवळ उल्हासनदी मध्ये तरंगताना आढळून आला आहे.मात्र मृतदेह सापडला त्याचे खाली दोन किलोमीटर अंतरावर कोल्हारे गाव असून त्या गावात राहणाऱ्या तरुणाचा मृतदेह आंबिवली जवळ कसा? असा प्रश्न उपस्थित होत असून पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.
नेरळ जवळील आंबिवली येथे कर्जत गावातून येणारी उल्हास नदी आणि मांडवणे येथून येणारी पेज नदी यांचा संगम होतो.त्या ठिकाणी तेथील आदिवासी सायंकाळी बकऱ्या चरायला घेऊन गेले होते. नदी काठी त्यांना अचानक रक मृतदेह दिसून आला, नदीच्या पाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृत देह हा पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले.त्याने गावातील प्रतिष्ठित व्यक्तीला फोन द्वारें ही माहिती दिली.त्यानंतर संबंधित व्यक्तीने नेरळ पोलीस ठाणात या बाबत माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.अधिक चौकशी नंतर ही व्यक्ती कोल्हारे येथे राहत असल्याचे समजले.या मृत व्यक्तीचे नाव मछिंद्र मारुती गवळी असून ही व्यक्ती चार मार्च रोजी कोल्हारे येथील राहत्या घरातून बेपत्ता झाली होती.
याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंदविण्यात अली आहे.मृत मछिंद्र गवळी यांना दारूचे व्यसन होते अशी माहिती पुढे येते . सध्या देशात संचार बंदी व लॉक डाऊन असल्याने दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दारूच्या शोधात तर ते गेले नव्हते ना असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ते परत घरी न आल्याने घरच्या मंडळींनी नेरळ पोलीस ठाण्यात तशी तक्रार नोंदवली. नेमके हे प्रकरण काय आहे? मृत मछिंद्र गवळी आंबिवली गावात कसे काय आले ?अशा अनेक प्रश्नांचा आता नेरळ पोलीस शोध घेत आहेत.