पुणे प्रवाह न्युज पोर्टल
_*उपमुख्यमंत्री कार्यालय,*_
_*मंत्रालय, मुंबई.*_
दि. 14 एप्रिल 2020.
*भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त*
*उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालयात अभिवादन*
मुंबई दि. 14 :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मंत्रालयात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन वंदन केलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला घरातंच थांबून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. आज मंत्रालयातही कोरोना अनुषंगानानं सुरक्षिततेची काळजी घेऊनच हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
0000000