आता 'एसआरए'मधून 'स्लम गॉड' निर्माण करा - सदानंद शेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना पत्र*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


Press Release


Respected Sir / Madam,


*आता 'एसआरए'मधून 'स्लम गॉड' निर्माण करा - सदानंद शेट्टी यांचे मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना पत्र* 


पुणे - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या  अपप्रचाराचा फटका आता आपल्याला कोरोनाच्यानिमित्ताने बसला आहे मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावाचे खापर झोपड्पट्टीवासीयांवर फोडले जात असले तरी दहा बाय दहाच्या खोलीत, झोपडीत आज आठ -दहा जणांचे कुटुंब 'लॉक डाऊन' मध्ये आहे. त्यामुळे  आगामी काळात झोपडपट्टी पुनर्वसनासाठी मोठ्या विकसकांना सवलत देऊन 'स्लम गॉड ' निर्माण केल्यास खऱ्या अर्थाने शहरच काय राज्य आणि देश झोपडपट्टीमुक्त होईल अशा आशयाचे पत्र पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना पाठवले आहे. 


याबाबत सदानंद शेट्टी यांनी पत्रात म्हटले आहे कि, आज कोरोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव घालत आहोत. उद्या परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर प्राधान्याने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे.  पंतप्रधान आवास योजनाही  अधिक गतिशील करावी. विकसकांना जास्तीस जास्त सवलत देऊन विकसक जिथे चांगली घरे बांधतात त्यांना त्या -त्या राज्यातील एकतरी झोपडपट्टीचे  पुनर्वसन करावे ही अट घालावी. परिणामी असे विकसक 'स्लम गॉड'म्हणून उदयास येतील. मोठ्या विकसकांसाठी हे सहजशक्य आहे.  कारण ते चांगली घरे बांधतात मात्र आजची नियमावली पाहता ते झोपडपट्टी पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा विकसकांना जास्त सवलत दिली पाहिजे. एका मोठ्या विकसकाने एका  झोपडपट्टीचे  पुनर्वसन केले तर  शहरच काय राज्य आणि देशही झोपडपट्टीमुक्त होईल. यादृष्टीने आता नियोजन करण्याची वेळ आली आहे आणि भविष्याच्या दृष्टीने ते खूप महत्वपूर्ण आहे. अन्यथा आज आपल्यावर  कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहे डेटॉलने स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. निर्जंतुकीकरण, फवारणी करावे लागत आहे. सर्व्हे करावा लागत आहे. हे टाळणे सहजशक्य आहे आणि झोपड्पट्टीवासीयांवर खापर न फोडता त्यांना चांगल्या सुविधा दिल्या तरच खऱ्या अर्थाने सोशल   डिस्टंन्सिग होईल.आज शासनाचा आदेश सर्वचजण पाळत आहेत पण कायमस्वरूपी हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यसरकार आणि केंद्रसरकारने त्यादृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.असेही सदानंद शेट्टी यांनी नमूद केले आहे. 



   ... रेड, ऑरेंज झोन करायची गरजच भासली नसती ! 


ज्यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन योज़ना आली तेंव्हा त्याला विविध कारणांनी अडथळा निर्माण झाला नसता. एफआयएसबाबत सकारात्मक निर्णय झाले असते तर ही  योजना प्रभावी ठरली असती आणि आता कोरोनानिमित्ताने रेड, ऑरेंज झोन करायची गरजच भासली नसती. जिथे झोपडपट्टी तिथे  झालेले पुनर्वसन आणि जिथे पुनर्वसन नाही झाले तिथे कोरोनाचा किती प्रभाव आहे हेही  पाहण्याची गरज आहे. याकडेही स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे.