नेरळच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील बाजार नियंत्रणाबाहेर...  भाजीपाला आणि फळांचे दरामधून लूट सुरू, सोशल डिस्टनसिंग चे तीनतेरा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नेरळच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील बाजार नियंत्रणाबाहेर... 

भाजीपाला आणि फळांचे दरामधून लूट सुरू,

सोशल डिस्टनसिंग चे तीनतेरा

कर्जत,ता.11 गणेश पवार

                                कोरोना मुळे आधी जमावबंदी आणि नंतर संचारबंदी लावण्यात आल्यानंतर नेरळ मधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भाजीपाला,दूध आणि फळ यांचे मार्केट हलविण्यात आले.तेथे सोशल डिस्टनसिंगचे पोलिसां कडून धडे दिले गेले.मात्र त्याच मैदानात भरवला जाणारा बाजार आता सोशल डिस्टनसिंग चे तीनतेरा वाजवत आहे.दरम्यान,20 फेरीवाले यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मैदानातील या बाजारात आता 100 हुन अधिक फेरीवाले दाटीवाटीने बसले आहेत.त्याचवेळी नेरळ मध्ये भाजीपाला,फळे आणि बाजारातील किराणा माल चढ्या भावाने विकला जात आहे,त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

                    कोरोनामुळे नेरळ बाजारपेठ मध्ये सुरू असलेले भाजीपाला चे विक्रेते आणि दूध तसेच फळांची विक्री करणारी दुकाने नेरळ पोलीस ठाणे आणि नेरळ ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेऊन 23 मार्च रोजी नेरळ गावात मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हलविण्यात आली.तेथे सुरुवातीला दहा भाजीपाला विक्रेते,पाच दूध आणि पाच फळे विक्रेते यांची दुकाने लावण्याची परवानगी देण्यात आली होती आणि त्यांना सोशल डिस्टनसिंग पाळण्यासाठी एक मीटर अंतर सोडून दुकाने लावण्यासाठी चौकोन आखून दिले होते. त्याचवेळी खरेदी साठी येणारे यांच्यासाठी देखील चौकोन आखून देण्यात आले होते.चार  दिवस नवलाईचे याप्रमाणे नेरळ मधील या मैदानातील बाजारात सोशल डिस्टन्स ठेवण्यात आला. मात्र आज या बाजारात 20 फेरीवाले भाजीपाला,दूध,फळे यांची दुकाने 100च्या पुढे गेली आहेत.त्याचवेळी त्यात त्या मैदानात आणि मैदानाबाहेर देखील फेरीवाले यांनी दुकाने थाटली असून एकमेकांना चिकटून दुकाने थाटली गेली असून स्वतः फेरीवाले हे सोशल डिस्टनिंग पाळत नाहीत.तर तेथे खरेदीसाठी येणारे यांच्याकडून पोलीस आणि ग्रामपंचायत यांनी कोणती अपेक्षा करायची?असा प्रश्न समोर आला आहे.दररोज सकाळ आणि सायंकाळी भरणाऱ्या या बाजारात नेरळ पोलीस यांचा खडा पहारा असतो आणि तरीदेखील फेरीवाले एकमेकाना चिकटून बसलेले दिसून येत असताना देखील कोणतीही कारवाई केली जात नाही.त्यात 23 मार्च रोजी बाजार मैदानात भरविण्याचा निर्णय झाला,त्यावेळी नेरळ गावातील भाजीपाला,फळे आणि दूध विक्रेते यांना त्या ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली होती.आज 60 टक्के फेरीवाले हे नेरळ गावाच्या बाहेरील असून त्यात उत्तर भारतीय अर्धे आहेत.

                              मात्र व्यवसाय करणारे यांनी त्या ठिकाणी सर्व नियम पायदळी तुडवले असून भाजीपाला आणि फळे ही चढ्या भावाने विकण्यास सुरुवात केली आहे.25 रुपयांना काल पर्यंत मिळत असलेली कोथिंबीर जुडी 100 रुपयांना विकली जात आहे.तर भाजीपाल्याचे दर हे शासनाने जाहीर केलेल्या नियमानुसार जास्त आहेत.असे असताना मटण आणि चिकन विक्रेते यांना ठराविक दराने विक्री करण्याचे बंधन करणारे नेरळ पोलीस यांना शिवाजी महाराज मैदानातील व्यवसाय करणारे यांच्याकडून आकारले जाणार दर याकडे दुर्लक्ष आहे काय?हे समजत नाही.तर किराणा दुकान खुली ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणी नवीन माल आला आहे आणि तो रेट वाढवून आला आहे असे सांगून चढ्या भावाने किराणा माल विकला जात आहे.यावर पोलीस किंवा प्रशासन लक्ष घालून काटेकोरपणे पालन करून घेणार आहे काय? हा देखील प्रश्न असून दरपत्रक शासनाने ठरवून दिलेले असताना देखील चढ्या भावाने किराणा मालाची विक्री नेरळ बाजारपेठ मध्ये सुरू असून त्यावर कोणाचे नियंत्रण असणार आहे किंवा नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.

 

 

 

 

 

 

तहेसीन सहेद-अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल,कर्जत तालुका

नेरळ गावात पोलिसांनी मटण आणि चिकन यांचे दर ठरवून दिले आणि त्यावर दर आकारणार्या विक्रेते यांच्यावर कारवाई करण्याची धमकी दिली.त्यानंतर तब्बल एक आठवडा नेरळ मधील मटण विक्रेते यांनी आपल्याला परवडत नाही म्हणून दुकाने उघडली नव्हती.त्यामुळे पोलीस मटण आणि चिकन च्या दुकानाकडे दरपत्रक यांचे काटेकोरपणे पालन करायला सांगत आहेत,पण भाजीपाला, फळे आणि किराणा दुकानात ग्राहकांची होणारी लूट त्यांना दिसत नाही काय?