बँक ऑफ महाराष्ट्रचे नवे कार्यकारी संचालक म्हणून श्री नागेश्वर राव रुजू

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रसिद्धीसाठी


बँक ऑफ महाराष्ट्रचे नवे कार्यकारी संचालक म्हणून श्री नागेश्वर राव रुजू


पुणे, 31 मार्च, 2020: श्री नागेश्वर राव हे बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक म्हणून आज दिनांक 31 मार्च पासून रुजू झाले आहेत. यापूर्वी श्री राव सिंडीकेट बँकेमध्ये 15 एप्रिल 2019 पासून ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी आणि पूर्ण वेळ संचालक होते. सिंडीकेट बँकेत येण्यापूर्वी श्री राव विजया बँकेमध्ये 22 जानेवारी 2016 पासून कार्यकारी संचालक होते


आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ वर्ष 1985 मध्ये श्री. नागेश्वर राव यांनी विजया बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून केला असून आजपर्यंतच्या 35 वर्षांच्या बँकिंगचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत झाल्यावर ते जनरल मॅनेजरपदापर्यन्त पदोन्नती घेताना त्यांनी शाखा प्रमुख, प्रादेशिक प्रमुख म्हणून आणि क्षेत्रीय स्तरावर तसेच मुख्यालयातील माहिती तंत्रज्ञान, नियोजन आणि विकास, जोखीम व्यवस्थापन व्यापारी बँकिंग, ग्राहक-संबंध यासारख्या महत्त्वाच्या जबाबदार्या हाताळल्या आहेत. त्यांनी या कारकिर्दीत कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, नागालँड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरात या मधील 12 केंद्रांमधून काम करत ते कॉर्पोरेट कार्यालयात रुजू झाले.     


वर्ष 2009-10 या दरम्यान ते विश्वेश्वरय्या ग्रामीण बँकेत संचालक म्हणून तर कॅनबँक कॉम्प्युटर सर्विसेस मध्ये वर्ष 2013-14 दरम्यान संचालक पदी होते


श्री राव हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांना अनेक भाषा सफाईदारपणे बोलता येतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग आणि फायनान्सचे प्रमाणित सहयोगी असलेले श्री नागेश्वर राव यांनी आय.आय.एम. अहमदाबाद, आय.आय.एम.कोझिकोड, CAFRAL आदी अशा अनेक उल्लेखनीय संस्थांमधून प्रशिक्षण प्राप्त केले असून 2011 मध्ये सिडने आणि 2016 मध्ये वॉशिंगटन येथे आयोजित कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला आहे. याशिवाय 2018 मधील सिडने येथील SIBOS परिषद आणि शिकागो येथील वर्ष 2019 मध्ये आयोजित आय.एस.बी. ग्लोबल अॅडव्हान्स्ड व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे.