पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाचे उदघाटन*
नगर परिषद पुसद येथे शुक्रवार दिनांक १७-४-२०२० रोजी पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकनियुक्त लोकप्रतिनिधी कर्तव्यदक्ष युवा आमदार श्री इंद्रनिल मनोहरराव नाईक यांच्या हस्ते कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या जोखिमेला न जुमानता कर्तव्यदक्षपणे पुसद शहराला अत्यावश्यक सेवा पुरविणारे नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व सामान्य नागरिकांच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्था यांच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत या कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी आमदार डॉ वजाहत मिर्झा, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ निर्मला राशीणकर, डॉ मोहम्मद नदीम, शेख कय्युम, उमाकांत पापीनवार, भारत जाधव, निशांत बयासआदी मान्यवर उपस्थित होते.