घरोघरी येणाऱ्या मनपा पथकास सहकार्य करण्याचे आवाहन, मा,मुरलीधर मोहोळ, महापौर,पुणे,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कृपया प्रसिद्धीकरिता,
०५/०४/२०२०,


घरोघरी येणाऱ्या मनपा पथकास सहकार्य करण्याचे आवाहन,
मा,मुरलीधर मोहोळ,
महापौर,पुणे,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंतर्गत पुणे महापालिका प्रशासनाने आजतागायत सर्व पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर यशस्वी उपाययोजना अंमलबजावणी करीत आहेत,
परंतु घरोघरी जाणाऱ्या मनपा पथकातील कर्मचाऱयांना काहीप्रसंगी अडचणीला सामोरे जावे लागत आहे,
घरामध्ये परदेश प्रवास करून कोणी आलेले आहेत का ?
घरातील कोणाला आजारपण,थंडीताप,खोकला,सर्दी,अथवा काही कोरोना सदृश लक्षणे दिसून येत आहे का,? विलगिकरण कशाकरिता व आवश्यकता काय,महत्वाचे उपाय ,अशी सर्व माहिती पथकातील कर्मचारी विचारून नागरिकांना कोरोना बाबत जनजागृती करून मार्गदर्शन करीत आहेत,
परंतु अजूनही काही नागरिकांकडून जलद सहकार्य व आवश्यक माहिती देण्याचे टाळले जात आहे,
अशा प्रकारे मनपा पथकाला माहिती न देणे,लक्षणे असताना न सांगणे,संशयित व्यक्तींचे नाव,पत्ते अथवा पुरेशी माहिती देत नसल्यामुळे पथकातील कर्मचाऱयांना अनेक अडचणी येउन प्रभावी उपाययोजना राबविण्याकरिता दैनंदिन अडचणी येत आहेत,
घरोघरी येणाऱ्या पथकाला करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाबाबत पुणे मनपाच्या वतीने वारंवार नागरिकांनी सहकार्य करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे,
तरी कृपया सद्धयस्थितीमधील कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करता पुणे मनपाच्या वतीने घरोघरी येणारे पथक,मनपा अधिकारी,कर्मचारी यांना सहकार्य करून कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधाच्या लढ्यात कृपया सर्वांनी सहकार्य करण्याचे या निवेदनानुसार मा,महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आवाहन केले आहे,
---------
लोकशाही दिन स्थगित,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्तिथीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना अंतर्गत १४,एप्रिल २०२० पर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी,लॉकडाऊन केलेले आहे,
या पार्श्वभूमीवर सभा,बैठका,नागरी समूह एकत्रित येणे अशा बाबींवर वरीलप्रमाणे कारणास्तव एकूणच बंदी असल्यामुळे पुणे महानगरपालिकेत दरमहा पहिल्या आठवड्यात आयोजित केला जाणारा लोकशाही दिन अर्थात एप्रिल २०२० मधील पहिल्या आठवड्यात लोकशाही दिन होणार नाही,सदरचा माहे एप्रिल २०२०,मधील लोकशाही दिन स्थगित करण्यात आलेला आहे,
तरी कृपया संबंधित नागरिकांनी याबाबत नोंद घेउन सहकार्य करावे,हि विनंती,
------------------मा,आमदार रोहित पवार यांचे वतीने सोडियम हायपोक्लोराईत मनपाकडे सुपूर्त,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधा करिता अलीकडेच मनपा प्रशासनाच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले होते,सदरच्या आवाहनास अनुसरून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे,
आज मा,आमदार रोहित पवार यांचे वतीने मनपास ५००,लिटर सोडियम हायपोक्लोराईत सुपूर्त करण्यात आले,
मा,आमदार रोहित पवार यांच्या वतीने,मनपाचे माजी उपमहापौर निलेश मगर यांनी सदरचे ५००,लिटर सोडियम हायपोक्लोराईत ( कॅन )  मनपाच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ, अंजली साबणे यांच्याकडे सुपूर्त केले,
याप्रसंगी मा,विरोधी पक्षनेत्या सौ,दिपाली धुमाळ,मा,सभासद योगेश ससाणे,मा,प्रदीप धुमाळ व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते,
--संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
०५/०४/२०२०,
-----------------


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image
मा. श्री. किशोर शितोळे यांना पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा2020 PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी 
Image