_कोरोना उंबरठ्यावर आलाय ना_  कोरोना न दिसणारा पण सहज व

पुणे प्रवाह न्युज पोर्टल



_कोरोना उंबरठ्यावर आलाय ना_ 


कोरोना न दिसणारा पण सहज व नकळत मृत्युकडे घेऊन जाणारा महाभयंकर असा विषाणु... काही महिन्यांपुर्वी चायना मार्गे जगभर हैदोस घालुन आपल्याही देशात त्याने आहीस्ते कदम येऊन शिरकाव केला... जगातील इतर देशांच्या तुलनेने केंद्र व राज्य शासनाच्या तत्परतेने व वेगवान हालचालींमुळे त्याचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजना केल्या गेल्या... कोरोना विषाणु केंद्र शासनाने सुरुवातीलाच केलेल्या २१ दिवसांच्या लाॅकडाऊन काळातच नष्ट झाला असता ह्यात शंकाच नाही.. परंतु, अनेक नागरीकांनी शासनाने व पोलिस विभागाने जीव तोडुन व पोट तिडकीने सांगुन देखील काळजी न घेतल्यामुळेच कोरोना हा विषाणु आज शहराशहरात फिरुन ग्रामीण भागातही शिरकाव करु पाहत आहे... आज तो आपल्या गावाच्या, शहराच्या उंबरठ्यावर आला आहे आणि तुम्ही घराबाहेर पडायचीच तो वाट पाहत आहे... आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा जीव वाचवायचाच असेल तर कृपया काही दिवस घराबाहेर, घराच्या आवारात, शेतातील शिवारात, शेजा-या पाजा-यांकडे, चौकात, नाक्यावर कुठेही जाऊ नका... आणि कोरोनाला सोबत घेऊन घरात येऊ नका... तुमची लहान मुलं, पत्नी, आई वडील, नातेवाईक ह्यांना अदृष्य असलेल्या कोरोनाच्या हवाली करु नका... निदान काही दिवस तरी... स्वतःसाठी व कुटुंबासाठी घरातुन बाहेर पडु नका... पोलिस कर्मचारी तुम्ही व तुमचं कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकुन न दिसणा-या कोरोनाला अडवण्यासाठी रात्रंदिवस कठिण परिस्थितीत रस्त्यावर उभे आहेत... तुमच्या एका चुकीमुळे तुमची व तुमच्या कुटुंबाचीही भरुन न येणारी हानी होऊ शकते.. म्हणुनच पुन्हा एकदा कळकळीची नम्र विनंती की, शासनाला व पोलिसांना सहकार्य करा... घरातच रहा, कोरोनाची शिकार होऊ नका... हे ही संकट लवकरच दुर होईलच...
*थोड़ीसी सावधानी कर लो, ना करो दइया दइया..*
*वरना फिर करते रह जाओगे, हाय मइया मइया..*