खाजगी डॉक्टरांवर कडक व तातडीने कारवाई करण्याबाबत.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
मुंबई..
द्वारा
मा.श्री.शेखर सिंग (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी, सातारा.


विषय : खाजगी डॉक्टरांवर कडक व तातडीने कारवाई करण्याबाबत.


मा.महोदय,
छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष -करण गायकर व केंद्रीय अध्यक्ष- प्रतापसिंह शिवाजीराव कांचन_पाटील यांच्या नेतृत्वाखाली,
मी सागर भारत साळुंखे-अध्यक्ष कराड तालुका.
छावा क्रांतीवीर सेना कराड तालुक्याच्या वतीने आपणास या पत्राद्वारे विनंती करु इच्छितो की,आज एकीकडे महाराष्ट्रासह देशात किंबहुना जगात न दिसणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरस मुळे एकच धुमाकूळ घातला असताना राज्यासह देशात सगळीकडे आ.पंतप्रधान व आ.मुख्यमंत्री साहेबांनी लॉक डाउन करत सर्व शासकीय डॉक्टर , सर्व हॉस्पिटल स्टाफ , मेडिकल दुकानदार , पोलीस महासंचालकसह राज्यातील सर्व पोलीस कर्मचारी बांधव ,सर्व पत्रकार बांधव , किराणा दुकानदार , दूध पुरवठा करणारे बांधव व कळत नकळत देश सेवा करणारी सर्व मंडळी एकीकडे स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करत आहेत. कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसताना आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत. अस असताना खाजगी डॉक्टर मात्र लपून बसलेले दिसत आहे. ज्यांना डॉक्टर ही पदवी प्रदान करत असताना रुग्णसेवा ही प्रामाणिक व निष्ठेने करण्याची शपथ दिली जाते आज तेच डॉक्टर आपापले खाजगी दवाखाने, क्लीनिक बंद करून लपून बसलेत हे दुर्दैवी आहे. वारंवार आपले मुख्यमंत्री आ. उद्धव ठाकरे साहेबांनी या बाबत सर्व खाजगी डॉक्टरांना आपापली क्लीनिक, दवाखाने उघडे ठेवायला सांगितले असताना किंबहुना आव्हान केले असताना मात्र त्यांचा या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे असे स्पष्ट होते. 
फक्त कोरोना व्हायरसचेच रुग्ण नसून इतर आजारांचे व नियमित आजारांचे पण पेशंट आज आपल्या राज्यात व देशात आहेत. त्यांना आज हे खाजगी दवाखाने बंद असल्याने खूप त्रास भोगावा लागत आहे याला जबाबदार कोण.
खऱ्या अर्थाने आज देशसेवा करण्याची वेळ आली असताना हे डॉक्टर गायब आहेत याचाच अर्थ त्यांना फक्त स्वार्थी व्यवसाय करायचा आहे सेवा नाही .अश्या डॉक्टरांना आता देशद्रोही का म्हणू नये. त्यांची पदवी का काडून घेऊ नये हे मायबाप सरकारने ठरवावे. आज ह्या डॉक्टरांची देशाला गरज असताना ते उपलब्ध नाहीत त्यांच्यावर कडक व तातडीने कारवाई करून सरकारने आपले कर्तव्य पार पाडावे ही नम्र विनंती.


आपला : 
सागर भारत साळुंखे
अध्यक्ष कराड तालुका
छावा क्रांतिवीर सेना,
महाराष्ट्र राज्य.