पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कृपया प्रसिध्दी करिता,
१४/०४/२०२०,
"कोरोनाशी लढा अवघड,मात्र कोरोनावर मात होणारच,
--मा,शेखर गायकवाड,
आयुक्त,पुणे महानगरपालिका,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रयत्नांनी मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे,यामध्ये नागरिक,विविध संस्था,संघटना सहभागी झालेल्या आहेत,
प्रदूर्भावाच्या कारणे व पार्श्वभूमी विचारात घेता शासनाकडून देण्यात आलेल्या सूचना सर्वानीच पालन करणे,व तोंडाला रुमाल,मास्क लावणे व शासन निर्देशानुसार सूचनांचे पालन करीत संचारबंदी काळात घरीच बसने,सुरक्षित रहाणे,व इतरांची काळजी घेणे व सामूहिक अशा प्रकारे लढा दिल्यास कोरोना विषाणू प्रादुर्भावावर मात करता येईल,असे प्रतिपादन मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले,
पुणे मनपास मदत देण्याकरिता मनपा आयुक्त कार्यालयात आलेल्या संस्था संघटनांच्या पदाधिकारी यांचेशी विबिध उपाययोजना बाबत चर्चा करण्यात आली,
याप्रसंगी मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले कि, कोरोना विषाणू प्रादुर्भाव विरोधात पुणे महापालिका नियोजनबद्ध यशस्वी लढा देत आहे,
अलीकडे मनपा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीसंदर्भात त्यांनी सांगितले कि, कोरोना विषाणू प्रतिबंधकरिता मनपा विविध उपाय करीत आहे,मात्र यानिमित्ताने मनपा रुग्णालयात नेमक्या कोणत्या व आवश्यक साहित्याची गरज आहे याची यादी केली व या साहित्याची खरेदी मदत स्वरूपात मिळणाऱ्या अर्थ साहाय्याने घेणे अशी कल्पना होती,परंतु याप्रक्रियेत अधिक सोपस्कारामुळे वेळ दवडण्यापेक्षा ज्या व्यक्ती, व संस्था, तसेच सामाजिक उत्तरदायित्ववाच्या CSR अंतर्गत मदत देणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना सांगितले कि, धनादेश देण्याऐवजी तेवढ्याच रकमेस अनुसरून संबंधित व्यक्ती व संस्थानी मनपाच्या आरोग्य विभागाकडील यादी पाहून यादीतील वैद्यकीय साहित्य,उपकरणे परस्पर खरेदी करून मनपास उपलब्ध करून द्यावीत असे सूचित केल्यावर सदरची कल्पना बऱ्याच संस्थासंघटनांना योग्य वाटल्यामुळे,अशा प्रकारे मदतीचे प्रमाणही वाढ होत असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले,
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे अलीकडे झालेल्या रुग्णालयातील कोरोना बाधित व्यक्तींच्या मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह नेण्यास व अंत्यविधी बाबत नकार दिला,अशा परिस्थितीत शासनाचे निर्देशानुसार पुणे मनपा आपल्या स्तरावर अंत्यविधी करेल, अशा परिस्थितीत काही मुस्लिम सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मदतीकरिता पुढे आले हि चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले,
लॉकडाउन कालावधी संपल्यानंतर कोरोनाच्या विषाणू प्रादुर्भाव परिस्थितीमुळे आलेल्या अनुभवानुसार भविष्य काळात आपल्याला आपली जीवनशैली कदाचित बदलावी लागेल,असे मा,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले,
--संजय मोरे,
माहिती व जनसंपर्क अधिकारी पुणे महानगरपालिका,
१४/०४/२०२०,