विचार सगळ्यांच्या फायद्याचा सन्मान देशाच्या कायद्याचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला घरातूनच महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करण्याचं सागर देशमुख आणि आदर्श शिंदेने केलं आवाहन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


घरीच थांबूसुरक्षित राहू भीमापुढे नतमस्तक होऊ


विचार सगळ्यांच्या फायद्याचा सन्मान देशाच्या कायद्याचा


- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला घरातूनच महामानवाच्या स्मृतीला अभिवादन करण्याचं सागर देशमुख आणि आदर्श शिंदेने केलं आवाहन


 


सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातही सध्या गंभीर परिस्थिती आहे. या आजाराचा धोका लक्षात घेऊन बाबासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता सागर देशमुख आणि सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी एक आवाहन केलं आहे. दरवर्षी १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी होते. त्यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोकं एकत्र जमत असतात. मात्र यंदा तसं न करता आपण घरुनच बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करावे असं आवाहन सागर देशमुख आणि आदर्श शिंदे यांनी केलं आहे.