केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटकडून विद्यार्थ्यांसाठी 'लर्न फ्रॉम होम'

पुणे प्रवाह न्युज पोर्टलकेजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटकडून

विद्यार्थ्यांसाठी 'लर्न फ्रॉम होम'

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'केजेईआय'चा पुढाकार; हर्षदा जाधव यांची माहिती

 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अशावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या वतीने 'लर्न फ्रॉम होम' संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. विविध सोशल साईट्स, लर्निंग अप्लिकेशन्स आणि मोबाईलच्या वापरातून नाविन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहे. 

 

संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांच्यासह खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव, संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, संकुल संचालक डॉ. व्यासराज काखंडकी यांच्या प्रेरणेतून आणि प्राचार्य डॉ. निलेश उके, डॉ. सुहास खोत, डॉ. बी. एम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व विद्यार्थ्यांना ही नाविन्यपूर्ण अभ्यासाची पद्धत उपयुक्त ठरत आहे.

 

याबाबत बोलताना 'केजेईआय'च्या व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा देशमुख म्हणाल्या, "संस्थेच्या सर्वच महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना या कठीण काळातही मौलिक मार्गदर्शन करीत आहे. कोरोनामुळे विद्यार्थी व प्राध्यापक आपापल्या गावी, घरी आहेत. मात्र, त्यांच्यातील हे अंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने दूर झाले आहे. या परिस्थितीला सर्वांनीच आव्हान म्हणून स्वीकारले आहे. संदेश, कॉल, फेसबुक, व्हॉट्सअप यासह वेबिनार, मुडल आदी अप्लिकेशन्सचा वापर करून शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या भविताव्याला उज्ज्वल बनवण्यासाठी प्राध्यापकांची ही कृती कौतुकास्पद आहे."

 

ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधील विभागप्रमुख प्रा. दीप्ती कुलकर्णी म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना रोज विविध विषयांच्या नोट्स, प्रात्यक्षिके, असाईनमेंट दिल्या जात आहेत. त्यांचे मूल्यमापन आणि त्यांना येणाऱ्या शंकांचे निरसन वैयक्तिक पातळीवर केले जात आहे. आठवड्याचे सबमिशन आणि त्याचा पाठपुरावा केला जातो. सर्व प्राध्यापकांच्या, विभागप्रमुखांच्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतल्या जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात अभियांत्रिकी शिक्षणात सातत्य राहण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल."

 

प्राध्यापकही शोधप्रबंध लिहीत असून, वेळेवेळी ज्ञान अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे डॉ. निलेश उके यांनी नमूद केले.