बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जावरील व्याजदर घटवले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जावरील व्याजदर घटवले


 


पुणे, एप्रिल 04, 2020: सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी, बँक ऑफ महाराष्ट्रने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नविनतम धोरणानुसार बाह्य बेंचमार्कशी संबंधित अर्थात रेपो रेटशी संलग्न कर्ज व्याजदरामध्ये 75 बीपीएस कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला असून दिनांक 07 एप्रिल 2020 पासून हे घटवलेले व्याजदर लागू होतील.


 


यामुळे रेपो रेटशी संलग्न कर्ज व्याजदराशी जोडलेली किरकोळ कर्जे जसे की गृह, शिक्षण आणि वाहन तसेच मध्यम-लघु-सूक्ष्म (एमएसएमई) कर्जे आता स्वस्त दरात उपलब्ध होतील. याचा प्रामुख्याने फायदा किरकोळ आणि मध्यम-लघु-सूक्ष्म (एमएसएमई) कर्जधारकांना होईल. 


 


बँकेने सर्व कालावधीतील फंड आधारित बेंचमार्क व्याजदर अर्थात् एमसीएलआर सध्याच्या दरापेक्षा 25 बीपीएस अंकांपर्यंत कमी केली आहेत. हे घटवलेले व्याजदर देखील दिनांक 07 एप्रिल 2020 पासून लागू होतील


 


बँकेचा ओव्हरनाईट, एक महिना आणि तीन महिन्याचा एमसीएलआर व्याजदर अनुक्रमे 7.50% (पूर्वीचा 7.60%), 7.60% (पूर्वीचा 7.70%),   आणि 7.70% (पूर्वीचा 7.75%) असे आता निश्चित केले आहेत तर सहा महिन्याचा कमी झालेला व्याजदर 7.80% (पूर्वीचा 7.90%), आणि एक वर्षासाठी कमी झालेला व्याजदर आता 8.00% (पूर्वीचा 8.25%) इतका झालेला आहे. 


 


कर्जव्याजदरांमध्ये घट करण्यामागचे बँकेचे लक्ष आर्थिक वृद्धीला आणि औद्योगिक विकासाला सहकार्य  करणे आणि दरांच्या प्रेषणाला निश्चित करणे हे आहे.