*पत्रकारांना ५० लाख विमा कवच आणि संरक्षण किट मिळावे.... आमदार लक्ष्मणभाऊ जगताप.*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*  


 


*कोरोना काळात पत्रकार आपला जीव धोक्यात घालून बातमी करतो,त्यांचा सन्मान करून इतरांन प्रमाणे ,पत्रकारांना विमा संरक्षण कवच आणि किट देण्यात यावे. .... आमदार.मा.लक्ष्मण जगताप*


पिंपरी -चिंचवड :- कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर डॉक्टर्स, नर्स मामा - मावशी ,सर्व आरोग्य कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी प्रमाणेच राज्यातील पत्रकार बांधवही कोरोना विरोधात एक प्रकारे लढाईच लढत आहेत. या लढाईत अनेक पत्रकार बांधवांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील पत्रकारांनाही कोरोना योद्धा हा दर्जा देऊन त्यांचा ५० लाखांचा विमा उतरविण्यात यावा. तसेच सरकारने पत्रकारांना कोरोना प्रोटोक्शन कीट द्यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.                               कोरोना समयी पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात घालून,संपूर्ण अपडेट ,सर्व स्तरातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तत्पर् असतात.त्या बदलत्या ,त्यांना मिळणारा मोबदला इतरांन पेक्षा तुटपुंज्य असतो.त्यामुळे या व्हायरस ने कुणीही पत्रकार बाधित झाला तर,त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असल्याने,त्या कुटुंबावर ही उपासमारीची वेळ येऊ शकते.त्यामुळे इतरांन प्रमाणे सर्व पत्रकारांना ५० लाख विम्यांचे कवच मिळालेच पाहिजे ,सोबत कोरोना पासून संरक्षण मिळावे,याकरिता संरक्षण कीट ही पत्रकारांना देण्यात यावे,अशी मागणी करणारे पत्र पिंपरी - चिंचवड शहर भाजपचे मा.शहर अध्यक्ष आणि चिंचवड मतदार संघाचे आमदार मा.लक्ष्मणभाऊ जगताप यांनी ,अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री मा. उद्धवजी  ठाकरे यांच्याकडे केली आहे.