अर्णब गोस्वामी ला कायद्याचा दणका  *तब्बल तेरा तास पोलीस इंटररोगेशन..

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


अर्णब गोस्वामी ला कायद्याचा दणका 
*तब्बल तेरा तास पोलीस इंटररोगेशन..*


धार्मिक ध्रुवीकरण तसेच बदनामीकारक चुकीचे वृत्त प्रसारित केले प्रकरणी रिपब्लिक भारत या न्यूज चॅनेल चा संपादक अर्णब गोस्वामी याचे विरुद्ध राज्याचे *ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मुंबई पोलिसांनी आज अर्णब गोस्वामी यांचे तब्बल 13 तास पोलीस इंटररोगेशन केले आहे*. सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांचे जामिनासाठी खालच्या कोर्टात जाण्यासाठी गोस्वामी ला अंतरिम संरक्षण दिले असतानाही पोलीस इंटररोगेशन करण्यात आले आहे त्यामुळे या गुन्ह्याची तीव्रता लक्षात येत आहे.


*पालघर येथे 2 साधू व त्यांचे 1 ड्रायव्हरची मॉबलिंचींग द्वारे हत्या करण्याच्या अनुषंगाने चुकीचे व धार्मिक ध्रुवीकरण करणारे तसेच काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक व बदनामीकारक वार्तांकन केली प्रकरणी*  मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान व महाराष्ट्र सह देशभर अर्णब गोस्वामी यांचे विरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. 


सदर गुन्हे रद्द करावेत व तोपर्यंत जामीन मिळण्यात यावा अशी याचिका गोस्वामी याने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने त्याचे म्हणणे फेटाळून लावत *महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दाखल केलेली FIR प्रमाणे चौकशी व्हायला हवी तसेच जर तुम्हाला जामीन अटकपूर्व जामीन घ्यायचा असेल तर तुम्ही खालच्या कोर्टामध्ये प्रोसिजर प्रमाणे जामीन अर्ज करावा व यासाठी तुम्हाला तीन आठवड्यांची मुदत देण्यात येत आहे. असे सुनावले होते.*
 
दरम्यान कायद्याप्रमाणे गोस्वामी याच्यावर करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे न्यूज चॅनेल व्ह्युव्हर्स मध्ये मोठ्या प्रमाणात समाधान असून न्यूजएंकर यांनी कोणत्याही प्रकारे कोणाच्याही धार्मिक भावना चेतवून जातील किंवा कोणाचीही बदनामी होईल अशा प्रकारचे बेजबाबदारपणाचे वार्तांकन करण्यापूर्वी आता कायदेशीर बाबींचा विचार करून *गोस्वामी सारखे कोणतेही बेजबाबदारपणाचे वार्तांकन कोणीही करणार नाही* असे नमूद केले आहे.


आपण म्हणजे खूप मोठे आहोत आपले कोणीच काही करू शकत नाही या अविर्भावात असणाऱ्या अर्णव गोस्वामी यांचे आज तब्बल 13 तास पोलीस इंटररोगेशन करण्यात आले आहे. सदर प्रकारचे इंटररोगेशन करण्यात आलेला देशातील पहिलाच संपादक ठरल्याने *पत्रकारितेला काळीमा फासला गेल्याने अनेक संपादक व पत्रकारांनी अर्णब गोस्वामी असा निषेध केलेला आहे.*



*गौतमजी आरकडे*
प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
(अनुसूचित जाती विभाग)
*अरविंदजी शिंदे*
गटनेते पुणे मनपा काँग्रेस पक्ष
*राहुल डंबाळे पक्षनेता*
रिपब्लिकन युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश
*सुजित यादव*
उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
(अनुसूचित जाती विभाग)
*सचिन आडेकर*
नगरसेवक पुणे मनपा
*लताताई राजगुरू*
नगरसेविका पुणे मनपा
*अजित दरेकर*
नगरसेवक पुणे मनपा
*रमेश अय्यर पक्ष प्रवक्ता*
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
*मेहबूब नदाफ*
युवा नेते