पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*'पुण्यभूषण फाउंडेशन' कडून नायडू हॉस्पिटलच्या*
*शंभर कर्मचाऱ्यांना किराणा सामानाची मदत*
------------------------ 'पुण्यभूषण फाउंडेशन'चा 'एक हात कृतज्ञतेचा'
पुणे :
पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने नायडू हॉस्पिटल मधील शंभर चतुर्थ श्रेणी व पॅरा मेडिकल स्टाफला प्रत्येकी ३५ किलो किराणा सामान आणि जीवनोपयोगी साहित्य भेट देण्यात आले आणि कोरोना साथीतील रुग्णांवर उपचार करणाऱ्या नायडू हॉस्पिटल च्या सेवकांसमोर एक कृतज्ञतेचा हात पुढे करण्यात आला.
'फौंडेशन तर्फे आम्ही ३०० कर्मचाऱ्यांना कृतज्ञता पूर्वक मदत करणार आहोत,पहिल्या टप्प्यात शंभर कर्मचाऱ्यांना मदत देऊन आलो,जे आपल्यासाठी जीवाची पर्वा न करता १८ तास काम करत आहेत,त्या देवदूतांना भेटून आलो, या त्यांच्या कामाबद्दल मानावे तेवढे आभार कमी आहेत,देव त्यांना उदंड आयुष्य देवो', अशा भावना.डॉ. सतीश देसाई यांनी व्यक्त केल्या.
'पुण्यभूषण फाउंडेशन' केवळ पुरस्कार,पहाट दिवाळी,दिवाळी अंक असे सांस्कृतिक उपक्रम करून थांबणार नाही,तर पुणेकरांच्या संकटातही आपले कर्तव्य बजावणार आहे',असेही डॉ देसाई यांनी सांगितले.
यावेळी पुण्यभूषण फाउंडेशनचे काका धर्मावत,दीपक दाते,मिलिंद बर्वे,शेखर केंदळे, संतोष उणेचा इत्यादी उपस्थित होते. नायडू हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी या अनोख्या कृतज्ञतेबद्दल आनंद व्यक्त केला. या किराणा आणि जीवनोपयोगी साहित्यासाठी मार्केट यार्ड मधील उत्तम बांठिया यांनी मदत केली.त्यांचे यावेळी फौंडेशन च्या वतीने आभार मानण्यात आले.
--------------------------------