नाशिक- मालेगावात उपचारादरम्यान आणखी दोन महिलांचा मृत्यू. एका कोरोनाबाधित तर एका कोरोना संशयितेचा मृत्यू. मालेगावात कोरोनामुळे आतापर्यंत १४ मृत्यू.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


अलर्ट (१८.३०)


साम-१७.३६
नाशिक- मालेगावात उपचारादरम्यान आणखी दोन महिलांचा मृत्यू. एका कोरोनाबाधित तर एका कोरोना संशयितेचा मृत्यू. मालेगावात कोरोनामुळे आतापर्यंत १४ मृत्यू.


साम-१८.०७
नर्सिंग होम सुरू न केल्यास परवाने रद्द. साथरोग नियंत्रण कायद्यानुसार होणार कारवाई. बंद खाजगी दवाखान्यावरही कारवाई. मुंबई महापालिकेचा निर्वाणीचा इशारा.


साम-१८.१९
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात आज नवे ३ रूग्ण. कल्याण डोंबिवलीत रुग्णांची संख्या ११७ वर. कल्याण-डोंबिवली- टिटवाळा प्रत्येकी एक रूग्ण. आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यू तर ३९ जणांना डिस्चार्ज.


टिव्ही ९ - १७.५८
पुणे विभागात रुग्णांची संख्या बाराशेवर. पुणे विभागात सध्या ९३९ रुग्ण उपचाराधीन. पुणे विभागात आतापर्यंत ७७ मृत्यू तर १८४ रुग्णांना डिस्चार्ज. ९३ पैकी ४२ रुग्णांची प्रकृती गंभीर. पुणे जिल्ह्यात १०९४ बाधित, एक मृत्यू. सातारा जिल्ह्यात २६ बाधित, दोन मृत्यू. सोलापूर जिल्ह्यात ४२ बाधित, तीन मृत्यू. सांगली जिल्ह्यात २८ बाधित तर एकाचा मृत्यू.


टीव्ही ९ - १८.०१
धारावीत आज २१ नवीन रुग्ण. धारावीत आतापर्यंत २४१ रुग्ण. आतापर्यंत धारावीत १४ जणांचा मृत्यू. दादर, माहिमसाठी दिलासादायक बातमी. याठिकाणी आज एकही रुग्ण नाही.


टिव्ही ९ - १८.०९
मुंबईत कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू. वाकोला पोलीस ठाण्यात होता कार्यरत. राज्यात आतापर्यंत ९६ पोलिसांना कोरोना. ९६ पोलिसांत १५ अधिकार्‍यांचा समावेश. गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याची माहिती.


लोकमत - १८.०६
कोल्हापूर - रेडझोनमधील जिल्ह्यांमुळे कोल्हापूरकर चिंतेत. सातारा, सांगली बेळगाव रेडझोनमध्ये.


लोकमत - १८.०७
सिंधुदुर्ग - रत्नागिरी सिंधुदुर्गात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर.