भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 'ऑन लाईन एज्युकेशन '*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 


*भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 'ऑन लाईन एज्युकेशन '*
------------------------------------------
*आय आय टी मुंबई व्हर्च्युअल लॅब  च्या सहकार्याने प्रॅक्टिकल्स* 


पुणे :


भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 'ऑन लाईन एज्युकेशन ' १८ मार्चपासून सुरु असून आय आय टी मुंबई व्हर्च्युअल लॅब  च्या सहकार्याने प्रॅक्टिकल्स पार पडत असल्याची माहिती प्राचार्य डॉ .आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे दिली.कोरोना विषाणू साथ आणि लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरूनच  'ऑन लाईन एज्युकेशन ' ची सुविधा प्राप्त करून देण्यात आली आहे.


आतापर्यंत ५२१ व्हिडीओ लेक्चर्स  द्वारे अध्यापन प्रक्रिया करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी ३०६८ असाइन्मेंट्स पूर्ण केल्या आहेत. व्हिडीओ लेक्चर्स ,पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ,ऑन लाईन प्लेसमेंट ट्रेनिंग,आणि आय आय टी मुंबई च्या व्हर्चुअल लॅब च्या सहकार्याने प्रॅक्टिकल्स पूर्ण केली जात आहेत.मेट्रोसका ,इधिटेक रिसोर्स पॅनल ,व्हाट्स अप मेसेंजर अशा सर्व माध्यमांची मदत घेतली जात आहे.विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
 
--------------------------------------------------------