अन्न धान्य जपून वापरा, ही वेळ रोज नव्या डिश करुन वाया घालवायची नाही

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मित्रांनो राग मानू नका. पचायला जड आहे. पण वाचायला आणि विचार करायला काय हरकत आहे? 


अन्न धान्य जपून वापरा, ही वेळ रोज नव्या डिश करुन वाया घालवायची नाही. आज वस्तुंचा पुरवठा होतोय, उद्या असलेच याची शाश्वती नाही.


जेवढे गरजेचं आहे तेवढं रांधा, वाढा, पण हौशीने रोज नवे प्रकार करुन उधळपट्टी टाळा. पुढील दिवस अवघड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगभरात पुरवठा कमी पडतोय, आज रांगा लावून मिळतंय ते उद्या असेलच असं नाही. उत्पादन/शेती करायला मनुष्यबळ कमी पडले तर कुठून येईल पुरवठा, वर पावसाळा येईल त्याबरोबर किती अडचणी येतील सांगता येत नाही. पाणी, वीज, अन्न सर्व जपून वापरा नंतर शहाणपण येऊन फार उशीर झाला असेल.


लॉक डाऊन मौज करायला नाही आहे. त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. ज्यांना तो पुढे गेला त्याचं कारण केवळ एक जमात आहे असं वाटतंय ते भ्रमात आहेत, त्यांनी त्यात भर घातलीय हे नक्की. पण मार्चच्या सुरुवातीस IMA ची एस्टीमेट्स सुप्रीम कोर्टाकडे गेली, त्यानुसार  हा काळ जुन अखेर पर्यन्त असु शकेल.. सावध आणि सजग व्हा.. ही बराच काळ चालणारी लढाई आहे, आत्ता तर फक्त रोगाचे थैमान आहे, त्याचे आर्थिक व्यवस्थेला बसणारे फटके भर घालतील. त्यात भरीला बदलणारे मोसम असतील हे सर्व नवे प्रश्न ,आव्हाने घेऊन येतील.


असणारे उपाय, पर्याय जपुन वापरणे ही प्रत्येकाची वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी एकाच वेळी आहे. नागरिक शास्त्र नागरिकांची काय जबाबदारी आहे यावर फारसा भर देताना दिसत नाही, नागरिकांची कर्तव्ये देशाप्रती काय आहेत याची आता तरी जाणीव प्रत्येकाला होणे अति आवश्यक आहे. केवळ सरकार, प्रशासन, आरोग्य व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था यांची जबाबदारी नाही.


Sustainance (उदरनिर्वाह टिकवणे) resilience (प्रतिकुल परिस्थितीनुरुप लवचिकपणा) हे शब्द यापुढची challenges असतील त्यासाठी तयारी करायला हा काळ वापरु.