*महाराष्ट्रात कोरोना चे थैमान तथा संकट असताना भाजपच्या नेत्यांचे मानसिक संतुलन का बिघडले...!*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*महाराष्ट्रात कोरोना चे थैमान तथा संकट असताना भाजपच्या नेत्यांचे मानसिक संतुलन का बिघडले...!*


पुणे - पिंपरी चिंचवड मध्ये 233 कोरोना रुग्ण आहेत. तर जिल्ह्यात 25 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राचा रुग्णांची संख्या 1364 इतकी आहे. 'मा. फडणवीस साहेब राजकारण करण्यासाठी माणसं तर जिवंत राहिली पाहिजेत.' मात्र राजकारणाचा कुठलाही मुद्दा सापडत नसल्यामुळे भाजप चुकीच्या पद्धतीने मानसिक संतुलन बिघडल्या सारखे राजकारण करत आहे. "कोरोना हिटलर बॉम्ब आणि दहशतवाद्यांना पेक्षा भयानक आहे." कारण आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला संरक्षण महत्त्वाचे आहे. जनता जगण्यासाठी आणि रोगापासून वाचण्यासाठी भयभीत होऊन एक महिन्यापासून घरात अडकून बसलेला (लाॕक डाऊन) आहे. आणि सरकारवर टीका करायची म्हणून त्यांनी हा पास मुद्दा हाताशी धरला आहे. राजकारण गेलं चुलीत, अगोदर माणसं जगण्यासाठी सगळ्यांनी मदत करा.


*#आती_क्या_खंडाला...!*


प्रकाश प्रशासनाला हाताशी धरून पैशावाल्या या गिधाडांनी पास मिळून खंडाळा - महाबळेश्वर प्रवास केला. आर्थिक हितसंबंध असल्यामुळेच हे पाच मिळाले असावेत असा संशय आम्हाला आहे. मात्र त्यांच्यावर काय करायचे कारवाई करायची हे राज्य सरकार मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी ठरवावे. व या कार्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे व त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करावा. मात्र भाजपने मदत करायची सोडून गलिच्छ राजकारण करू नये. 


"आज निवडणुका आत्या प्रत्येक नागरिकाच्या दारात जाऊन ३ महिन्याचा किराणा याच राजकीय गिधाडांनी दिला असता. मात्र निवडणुकीचा मुद्दा नसल्यामुळे लोक घरात अडकून उपाशी मरत आहेत, हे कुणालाच दिसत नाही. सगळे नगरसेवक - आमदार - खासदार शहरातून पळून गेलेले आहेत किंवा गप्प घरात मूग गिळून बसले आहेत."


महाराष्ट्रातील भाजपच्या आमदार खासदारांनी आपला निधी भाजपच्या पक्ष निधी मध्ये जमा का केला...? त्यांना महाराष्ट्र सरकारला मदत करावीशी वाटली नाही...? जे भाजप नेते स्वतःच्या पक्षाच्या खात्यामध्ये 'पैसे जमा' करु शकतात ते महाराष्ट्राचं खातात आणि दिल्लीच्या गुण गातात...! अशीच परिस्थिती सध्या आहे. इतका राजकीय सूड आणि करंटेपणा करणाऱ्या भाजपच्या लोकांनी विनाकारण सूडबुद्धीने फालतू राजकारण करू नये. मुळात भाजपला कुठल्याही विषयावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.


'कोरोना' भयानक संकट आहे. लोकांना खायला अन्न नाही. महिन्याभरात सर्व किराणा संपला. केंद्रसरकारचे ५ किलो तांदूळ अजून लोकांच्या पोटात गेलेला नाही. हे कधी मिळणार याची शंका आहे...? व्हायरसमुळे लोक मरण्यापेक्षा 'भूक बळीने' हजारो लोक उद्ध्वस्त होतील अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षाने विरोधाचे, सुडाचे मुद्दे बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कायदा सर्वांसाठी आहे, कोणीही कायदा मोडल्यानंतर पाठीशी घालू नये.


*'संभाजी ब्रिगेड' (आम्ही) घरात बसून सल्ले देणार नाही तर... सरकार सोबत प्रत्येक सामान्य लोकांची मदत करणार...!* प्रशासनातील काही गिधाडं पैसेवाल्या (आरोपींना) वाधवन कुटुंबातील लोकांना जर VIP ट्रीटमेंट देत असतील तर अशा अधिकाऱ्यांचे 'निलंबन' झाले पाहिजे. आमची सामान्य जनता शहरात/घरात अडकून बसली. रस्त्यावर पोलिसांच्या काट्या खाऊन 'हात-पाय सुजून' निघालेत आणि हे मात्र 'पास' दाखवून... *#आती क्या खंडाला...!* म्हणत असतील तर चुकीचा आहे.


अमिताभ गुप्ता'वर सरकारने निलंबन करून गुन्हा दाखल केला पाहिजे. अजून किती जणांना पास दिले आहेत त्याची ही चौकशी झाली पाहिजे.


- संतोष शिंदे,
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.