दहिवली ग्रामपंचायत व लब्धी गार्डन यांच्या कडून १२० कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप,  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 



दहिवली ग्रामपंचायत व लब्धी गार्डन यांच्या कडून १२० कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप,  


कर्जत दि. 3 गणेश पवार

 

             जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूला देशातून हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे मात्र उत्पन्नाचे स्रोत नाहीसे झाले आहे.  त्यामुळे दहिवली ग्रामपंचायत  हद्दीतील अशा लोकांना ग्रामपंचायत सह अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत. परिसरातील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, यांच्या मदतीने ग्रामपंचायतीने सुमारे १ महिन्याचे किराणा सामान दिले आहे.    

              जगावर सध्या कोरोना या विषाणूचे संकट ओढावले आहे. या विषाणूंवर अद्याप कोणते औषध जरी उपलब्ध नसले तरी सामाजिक अंतर, व स्वच्छता यामुळे या विषाणूचा फैलाव आपण रोखू शकतो. तेव्हा या संकटाला हरवायला देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. या लॉकडाऊन अंतर्गत घरातून बाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे. संबंध देश या लढाईत सामील झाला आहे. मात्र यादरम्यान ज्यांचे पोट हातावर आहे जे आज कमावून आज खातात अशा आर्थिक दीन दुर्बल घटकांची परिस्थिती मात्र चिंताजनक झाली आहे. कमावलंच नाही तर खाणार कुठून अशी स्थितीने त्यांची काळजी वाढीस लागली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील अशा घटकांची स्थिती माहित असल्याने ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य यांनी परिसरातील उद्योजक,  लब्धी गार्डन यांच्या विकासक, सामाजिक कार्यकर्ते यांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक मदतीचे हात पुढे आले. त्यानुसार दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील १२० कुटुंबाना महिनाभर पुरेल एव्हडे जीवनावश्यक धान्य, डाळी व मसाले यांचे वाटप करण्यात आले. या जीवनावश्यक वस्तू वाटपा वेळी सामाजिक अंतर राखण्यात आले. 

             यावेळी दहिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच चिधुशेठ तुकाराम तरे ग्रामसेवक अरुण राजपुत, उपसरपंच यशवंत बळीराम भवारे सदस्य  महेश सुदाम मोरगे , कैलास तुकाराम विरले , राजेश भोईर हर्षद कुंभार, जनार्दन निरगुडा, सचिन तरे , रमेश कुंभार, अरुण विरले, आणि लब्धी गार्डन चे कर्मचारी वर्ग  आदी मान्यवर उपस्थित होते