पुणे-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती लागू करण्यात आली आहे....मा.नवल किशोर राम पुणे जिल्हाधिकारी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे- 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लॉकडाऊन परिस्थिती लागू करण्यात आली आहे. लॉक डाऊन परिस्थितीमुळे आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी (उदा.अॅम्ब्युलन्स, आवश्यक औषधे इत्यादी. )उपलब्ध होण्यासाठी जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षात संपर्क करुन आपली तक्रार नोंदवावी.  तक्रार निवारणासाठी समन्वय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी
श्रीमती मनिषा कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे. हा नियंत्रण कक्ष 24 x 7 कार्यरत असून, तेथील संपर्क क्रमांक 02026123371 आहे व 1077 असा टोल फ्री क्रमांक आहे.
 कोरोना विषाणुच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरीकांना आरोग्यविषयक व आवश्यक औषध पुरवठा विषयक तक्रारीसाठी सदर नियंत्रण कक्षाकडे तक्रार देण्यात यावी व सदर तक्रारीचे तात्काळ निरसन व अंमलबजावणी सदर नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येईल, 
असे जिल्हाधिकारी
नवल किशोर राम यांनी
 कळविले आहे.