पुणे प्रवाह न्युज पोर्टल
नेरळ ग्रामपंचायत कडून 8000 कुटुंबांना धान्य वाटप करण्यास सुरुवात
कर्जत,ता.
कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरळ ग्रामपंचायत मध्ये 12हजार कुटुंब असून त्यातील 8000 कुटुंबांना ग्रामपंचायत च्या माध्यमातून धान्य वाटप केले जात आहे. कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांचे हस्ते या उपक्रमाची नेरळ ग्रामपंचायत कार्यलयात सुरुवात झाली आहे.
नेरळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून 14 वित्त आयोग, ग्रामपंचायत चा 15 टक्के अनुदान निधी आणि 5टक्के विशेष अनुदान यातील निधी मधून कोरोना मुळे झालेला लॉक डाऊन मध्ये नागरिक,ग्रामस्थ आणि आदिवासी कुटुंब यांना मदत करण्यासाठी धान्य वाटप केले जात आहे.नेरळ ग्रामपंचायत हद्दीत 12 हजार कुटुंब असून त्यातील 8000 कुटुंब यांना धान्य वाटप केले जाणार असून या उपक्रमाची सुरुवात नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत झाली.त्यावेळीकर्जत चे प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख,कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी आणि नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.नेरळ ग्रामपंचायत चे सरपंच रावजी शिंगवा आणि नेरळ शिवसेनेचे शहर प्रमुख रोहिदास मोरे यांचे हस्ते आदिवासी कुटुंबाला धान्याचे किट देऊन सुरुवात झाली.त्यावेळी नेरळ ग्रामपंचायत चे उपसरपंच शंकर घोडविदे, सदस्य मंगेश म्हसकर,प्रथमेश मोरे,धर्मानंद गायकवाड, नितीन निर्गुडे,राजन लोभी,संतोष शिंगाडे,अतुल चंचे,उषा पारधी,श्रद्धा कराळे,पार्वती पवार,शारदा साळेकर,रेणुका चंचे,गीतांजली देशमुख, उमा खडे आणि शिवाली पोतदार आदी उपस्थित होते.
नेरळ ग्रामपंचायत मध्ये सहा प्रभाग असून प्रभागवार हे धान्याचे किट वाटले जाणार आहेत.ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या 12 आदिवासी वाड्या आणि अन्य नागरी वस्ती मध्ये राहणारे गरजू यांच्यासाठी किट बनविण्यात आले असून हे किट वाटप करताना सर्व सदस्य यांना त्या त्या प्रभागात जाऊन वाटप करण्याचे नियोजन सरपंच रावजी शिंगवा यांनी केले आहे.त्या धान्याचे किट मध्ये तांदूळ, तूरडाळ,साखर,चहा पावडर, साबण,मसाले,बिस्कीट आदी साहित्य असून त्याचे किट बनविले आहेत.यापूर्वी नेरळ ग्रामपंचायतने कोरोना पासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी सॅनिटायझर च्या बाटल्या घरोघरी जाऊन दिल्या आहेत.तर गावात जंतुनाशक फवारणी केली जात असून दोन ठिकाणी सॅनिटायझर कक्ष सुरू केले आहेत,त्याचवेळी शहरात आणि वाडी वस्तीमध्ये सॅनिटायझर फवारणी केली जात आहे.
वैशाली परदेशी-प्रांत अधिकारी
सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कडून दिलेले धान्य हे घरी नेऊन उन्हात काही तास ठेवावेत. जेणेकरून त्यात काही असल्यास ते उन्हामुळे नष्ट होऊ शकतात आणि त्याचा फायदा आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी होऊ शकतो.