कर्जतच्या गुडवण गावातील रेशन दुकानदाराचा प्रताप... 8 रेशन कार्ड फाडली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कर्जतच्या गुडवण गावातील रेशन दुकानदाराचा प्रताप... 8 रेशन कार्ड फाडली

कर्जत,,ता.16 गणेश पवार

              कर्जत तालुक्यातील गुडवण वाडी मधील आठ आदिवासी रेशन धान्य घेण्यासाठी आले असता त्यांची रेशन कार्ड गुडवण येथील रेशन दुकानदार यांनी फाडून टाकली आहेत.त्यामुळे खळबळ माजली असून आज सकाळी हा प्रकार घडला असून त्या आदिवासी लोकांना आता रेशन अभावी धान्य मिळण्याची शक्यता मावळली आहे.

                 तालुक्यातील गुढवण वाडी येथील आठ आदिवासी हे रेशन घेण्यासाठी आज 16 एप्रिल रोजी सकाळी गुडवण येथील रेशन दुकानात पोहचले होते.त्यावेळी रेशन दुकानदार जगदिश कोंडू खडे यांनी गुडवणवाडी मधील आठ आदिवासी लोकांची रेशनिंग कार्ड फाडून टाकली.त्यामुळे त्या आदिवासी लोकांना काय सुरू आहे हे कळले नाही आणि आपली फाटलेली रेशन कार्ड परत देण्यात आली,तेंव्हा धक्का बसला असून आदिवासी ग्रामस्थ या घटनेने घाबरले आहेत.त्यांनी ही बाब कर्जत पंचायत समिती सदस्य जयवंती हिंदोळा यांना ही त्याबाबत माहिती दिली.हिंदोळा यांनी कर्जत चे तहसीलदार विक्रम देशमुख यांना गुडवणवाडी मधील रेशन कार्ड बाबत लक्ष घालण्याची मागणी केली.

                      गुडवणवाडी येथील गौरी धोंडू पारधी, पंढरीनाथ रावजी पारधी,बाळु मारुती निरगुडा,आत्माराम रावजी पारधी,नारायण रावजी पारधी, हरीचंद्र कान्हु नारगुडा,यशवंत देहु खंडवी,शंकर पांडुरंग खंडवी,यांचे या आदिवासी बांधवांची रेशनकार्ड फाडली गेली आहेत.त्या आदिवासी ची रेशन कार्ड फाडल्याने त्यांना रेशन दुकानात धान्य मिळण्याची शक्यता कमी असून त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ यामुळे आली आहे.
 


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली