एक सामाजिक बांधिलकी म्हणून दत्तवाडी भागातील कुटुंबाना  मोफत घरपोच 5-6 दिवस पुरेल इतकं भाजी कीट देत आहेत.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे शहरामध्ये कोरोना च्या वाढत्या संकटामुळे एक आगळा वेगळा  उपक्रम सामाजिक कार्यकर्ते ईम्तियाज शेख यांनी दत्तवाडी येथे राबवत आहे.
एक सामाजिक बांधिलकी म्हणून दत्तवाडी भागातील कुटुंबाना 
मोफत घरपोच 5-6 दिवस पुरेल इतकं भाजी कीट देत आहेत.
जेणेकरुन लोक घराबाहेर पडू नयेत.
दररोज 350-400 घरापर्यंत भाजी कीट पोहचवत आहे. 
आत्तापर्यंत 1500 घरापर्यंत भाजी कीट पोहोचवले आहेत.
या अभियानामार्फत  स्थानिक रहिवाशांना घरातुन बाहेर पडू नका असे आवाहन ईम्तियाज शेख करत आहेत.
तसेच अविरत 26 दिवस जेवण वाटपाचा उपक्रम चालू आहे,
प्रसाद खांदवे व आकाश धुमाळ यांच्या समन्वयातून गोरगरीब नागरिकांना व विद्यार्थीना तसेच परप्रांतीय नागरिकांना जेवण वाटपाचा उपक्रम निरंतर चालू आहे.
दत्तवाडी भागातील नागरिकांनी ईम्तियाज शेख यांच्या प्रयत्नांचे, व्यवस्थापनाचे,स्तुत्य अभियानाचे कौतुक केले.
समाजात फिरत असताना कळते की परिस्थिती व नुकसान खुप भयानक आहे,
पोलिस, प्रशासकीय अधिकारी/कामगार वर्ग यांचे कुटुंब सुध्दा घरीच आहे, तुम्ही सुद्धा घरीच थांबा. तुमच्या चुकीची किंमत तुमच्या घरच्यांना, शेजारच्या लोकांना व देशाला मोजायला लावू नका, असे वारंवार आवाहन ईम्तियाज शेख करत आहेत.