भाड्याने राहणाऱ्यांना गृहनिर्माण विभागाचा दिलासा; 3 महिने भाडे न घेण्याच्या घरमालकांना सूचना*_

पुणे प्रवाह.न्युज पोर्टल


 


 


🏠 _*भाड्याने राहणाऱ्यांना गृहनिर्माण विभागाचा दिलासा; 3 महिने भाडे न घेण्याच्या घरमालकांना सूचना*_


🔜 _घरभाडे वसुली किमान 3 महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून किंवा घरभाडे थकल्याने कुणालाही घराबाहेर काढू नये, अशा सूचना गृहनिर्माण विभागाने राज्यातील घरमालकांना दिल्या आहेत. राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या सर्वांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे._


🧐 _ज्यामध्ये 23 मार्च ते 3 मे 2020 या काळात लॉक डाऊन असल्याकारणाने बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने व एकूणच आर्थिक गतीविधी बंद आहे. अशा घर मालकांसाठी गृहनिर्माण विभागाने सूचना दिल्या आहेत_


💸 _सध्याच्या परिस्थितीमध्ये भाडेकरुंना ते राहत असलेल्या घरांचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नसल्याने भाडे थकले आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाडेवसुली किमान 3 महिने पुढे ढकलावी व या काळात भाडे न भरल्यास कुणालाही घरातून काढू नये, अशा सूचना राज्यातील सर्व घरमालकांना देण्यात येत आहे._