धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे अंबाजोगाई येथे कोविड-19 विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेस मंजुरी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे अंबाजोगाई येथे कोविड-19 विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेस मंजुरी*


*करोनासह कोणत्याही विषाणू संसर्गाचे  होणार तातडीने निदान व संशोधन*


परळी :----  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे
कोविड 19 विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेस महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे . या  विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत केवळ करोनाचीच नव्हेतर भविष्यात उद्भवणाऱ्या कुठल्याही ही विषाणूच्या संसर्गाचे संशोधन व निदान केले जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे कार्यासन अधिकारी अमु डहाळे यांनी याबाबतचे एक पत्र  संचालक,  वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन यांना पाठवले असून या पत्रामध्ये अंबाजोगाई सह राज्यातील कोल्हापूर, बारामती, जळगाव ,गोंदिया, नांदेड  येथेही  कोविड 19 तपासणीसाठी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापित करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
 राज्यात निर्माण झालेल्या करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी या विषाणूचा संसर्ग झालेल्या नागरिकांचे तातडीने तपासणी होणे आवश्यक आहे . बीड जिल्ह्यातील रुग्णांचे रिपोर्ट औरंगाबाद , पुणे येथे पाठवावे लागत होते . 
जिल्ह्यातील रुग्णांचे रिपोर्ट अंबाजोगाई  येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तपासले जाऊ शकतात ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री अमित देशमुख यांच्याकडे यासंदर्भातील मागणी केली होती. 
 त्यानुसार शासनाने तातडीने वरील ठिकाणी विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा मंजुरी देताना त्यात अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेसही मान्यता दिली आहे.
 या प्रयोगशाळेत केवळ करोनाच नव्हे तर भविष्यात उद्भवणा-या कोणत्याही विषाणू संसर्गाचे संशोधन व निदान होणार आहे.
 या प्रयोगशाळेसाठी इमारत व साधन सामग्री असा सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो आपण जिल्हा विकास निधी  ( डी.पी.डी.सी. ) मधून उपलब्ध करून देऊ असे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
 सदर प्रयोगशाळा तातडीने कार्यान्वित करण्याबाबत पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार व अंबाजोगाई येथील रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांना निर्देश दिले आहेत.


Popular posts
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..* *शुभेच्छुक:-........ संपादक संतोष सागवेकर ,सा.पुणे प्रवाह परिवार.....
Image
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
स्व. श्रीमती पुष्पा अशोक भुजबळ यांचे अल्पशा आजाराने निधन
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image