सलग 12 दिवस कोरोनात घरोघरी जेवण वाटतोय पुण्यातील प्रवीण डोंगरे!*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*#Day12*
*सलग 12 दिवस कोरोनात घरोघरी जेवण वाटतोय पुण्यातील प्रवीण डोंगरे!*


सध्या कोरोना तसेच लॉकडाऊन मुळे जनजीवन विस्कळीत असून स्वताचे घर वस्ती सोसायटी अघोषित जेल म्हणून उदयास आल्याचे चित्र चोहीकडे पहावयास मिळत आहे.
ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी किराणा भरून ठेवला परंतु जे कष्टकरी हातावरचे पोट असणारे रोज कष्ट करून खाणारे यांचे हाल होऊ लागले आहेत, एवढंच नव्हे तर अनेक विद्यार्थी व मेस वर अवलंबून असणारे कामगार यांचे देखील खाण्या पिण्याचे हाल होत आहे .
सगळीकडे अनेकांनी आपापल्या परीने एक दोन दिवस फूड पॅकेट वाटले त्याचे कौतुक आहेच त्याच पद्धतीने एक तरुण शिवसेना व कै दत्तू डोंगरे फाउंडेशन च्या वतीने प्रवीण डोंगरे फूड पॅकेट सुरवातीला जनवाडी-गोखलेनगर भागातील कुसाळकर चौक, ओंबळे पटांगण ,जनता वसाहत या तीन ठिकाणी वाटप सुरू केले.व नंतर स्वता आपल्या सहकारी सोबत घरोघरी जाऊन सुमारे दोनशे जणांना स्वखर्चाने फूड पॅकेट रोज दुपारच्या वेळेस एक वेळचे जेवण देत आहे . यांपैकी अनेक परिवार हे या एक वेळच्या जेवणावर आपले दिवस काढत आहे.


*विशेष आभार: News CHANNEL मराठी दुनियादारी (पुणे,अल्ताफ पिरजादे.11 एप्रिल 2020,)*


*सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविण दत्तु डोंगरे*
(*शिवसेना विभाग प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*