*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*पुणे:-*
*कोरोना हारेल आणि*
*देश जिंकेल*
*पुणे:* *सध्या कोरोनाशी जग आणि आपला देश , तसेच आपल्या पुणे शहराला ही ग्रासले असल्याने,*
*केंद्र सरकार कडून ,राज्य सरकार ला आदेश देण्यात आले आहे की,कोरोना ग्रस्त परिस्थिती धोकादायक वळणावर जाऊ नये, *यासाठी केंद्रा कडून संपूर्ण देशभर ,सर्व राज्यांना लाँक डाऊनचे आदेश दिले आहेत. आणि त्याचे काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे.* *कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आणि पुणे पोलिसांन कडून , पुणे शहर - जिल्हात जमावबंंदी अंंतर्गत कलम १४४ प्रमाणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.*
*त्यामुळे नागरिकांनी घरामध्ये च थांबणे आवश्यक असून,विनाकारण घरा बाहेर जाणे टाळावे.आपली ,आपल्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्या.सावधान कोरोनाग्रस्त रुग्णांना मध्ये वाढ होण्याची परिस्थिती निर्माण होऊन,परिस्थिती आटोक्या बाहेर जाऊ नये,हे मोठे आव्हान केंद्र,राज्य आणि पोलीस प्रशासना समोर असल्याने.....*
*प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी ,मुख्यमंत्री मा.उध्द्वजी ठाकरे , उपमुख्यमंत्री मा.अजितजी पवार,आरोग्य मंत्री डॉ. मा.राजेशजी टोपे,*पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड,*
*पिं चिं मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर,*
*मा.मुरलीधर मोहोळ - महापौर -पुणे मनपा ,सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे महापौर - पिं - चिं. मनपा,*
*तसेच*
*पुणे आणि पिं - चिं मनपा* *जिल्हा आणि ग्रामीण आरोग्य विभाग सर्व डॉक्टर,सिस्टर आणि कर्मचारी,पुण्याचे आयुक्त के.व्यंकटेशम,पुण्याचे सह पोलीस* *आयुक्त रवींद्र शिसवे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील*
*हे सर्वजण मागील काही* *दिवसापासून पुणे जिल्हा स्तरावर, आप - आपल्या परीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता कार्यरत असून,जनसेवेचे प्रवित्र कार्य करून,कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत*
*या सर्वाचे मानावे आभार तेवढे थोडे आहे.*
*त्याचप्रमाणे यामध्ये आम्ही पत्रकार बांधव ही आप -आपल्या परीने बातम्या मार्फत योग्य आणि अचूक माहिती पोहचवून कोरोना विषयी जनजागृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जीव धोक्यात घालून प्रिंट , टि व्ही चँनर्ल चे सर्व पत्रकार बांधव ही आघाडी आहेत.त्यांचेही जाहीर आभार मानण्यांचे आपले परम कर्तव्य आहे.*
*सर्वजण आप - आपल्या परीने कोरोना ग्रस्त परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी प्रयत्नशील आहेत.*
*सर्व नागरिकांना जाहीर नम्र विंनती ..... विशेषतः याकाळात पुणे पोलीस प्रशासनावर जास्त भार असल्याने,आणि हे सर्व जण आपल्या सेवेसाठी ,आपले आणि आपल्या परिवार आणि आपला परिसर कोरोनाग्रस्त मुक्त होण्यासाठी दिवसरात्र रस्त्यावर उतरून ,आपल्या सुरक्षितेकरिता हे पोलीस बांधव सेवाकार्य करण्याचे अनमोल कार्य करित आहेत.*
*त्यामुळे आपल्या सर्व सामान्य नागरिकांचे ही परम कर्तव्य आहे की,आपण या जमावबंदी काळात ,कलम १४४ प्रमाणे पुणे जिल्हांत संचारबंदी लागू असताना,घाबरून न जाता,आपली ,आपल्या संपूर्ण कुटुंबांची आणि परिसराची जवाबदारी आपल्या वरही असल्याने,आपण निरोगी तर कुटुंब आणि परिसर निरोगी.*
*त्यामुळे विनाकारण गरज नसताना घरा बाहेर पडू नये.केंद्र,राज्य आणि पोलीस प्रशासन वेळेनुसार ,ज्याकाही सुचना ,नियम किंवा आदेश पाळण्याचे आवाहन* *करतील*,
*त्यांचे काटेकोर पणे पालन करुन ,पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,ही हात जोडून*
*नम्र विंनती*
*धन्यवाद..........*
*कळावे,*
*आपला*
*संपादक संतोष पी.सागवेकर*
*सा.पुणे प्रवाह परिवार*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती*
*करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692*
*व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmai*
*.com*
*मेलवर पाठविणे*
*बंधनकारक*