लॉकडाऊन कालावधीत पुणे महापालिकेच्या खास हेल्पलाईन*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


📲📞


*लॉकडाऊन कालावधीत महापालिकेच्या खास हेल्पलाईन*


पुणे :
वेगाने वाढणाऱ्या करोना व्हायरसच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी या संदर्भातील खबरदारी म्हणून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. या सेवा मिळविण्यात नागरिकांना अडचणी येऊ नयेत यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने खास हेल्पलाईन सुरू केल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली. 


करोना व्हायरसमुळे सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत पुणेकर नागरिक अत्यावश्यक सेवांपासून वंचित राहू नयेत याची खबरदारी पुणे महापालिका घेत आहे.


लॉकडाऊनच्या कालावधीत अन्न, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंची गरज नागरिकांना भासू शकते. तसेच आरोग्याच्या दृष्टीने काही वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत आपल्या भागातील संबंधित सेवा उपलब्ध नसल्यास नागरिकांना त्या सेवा कुठे उपलब्ध होतील याबाबतची माहिती देणे तसेच त्या सेवा उपलब्ध करून देण्यात आवश्यक ती मदत प्रशासकीय पातळीवर केली जाईल अशी ग्वाही, अग्रवाल यांनी दिली. या अनुषंगाने जीवनावश्यक सेवांबाबत मदत हवी असल्यास नागरिकांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.


020-25506800
020-25506801
020-25506802


020-25506803
020-25501269


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image
मा. श्री. किशोर शितोळे यांना पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा2020 PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी 
Image