संभाजी ब्रिगेड आपल्या दारी...🚩 *मराठवाड्या'सह (संपूर्ण महाराष्ट्र) जर कोणी पुण्यात असेल आणि त्यांना कुठेही जेवणाची व्यवस्था होत नसेल तर... आम्ही तुम्हाला जेवण देऊ...*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


सप्रेम जय जिजाऊ...


संभाजी ब्रिगेड आपल्या दारी...🚩


*मराठवाड्या'सह (संपूर्ण महाराष्ट्र) जर कोणी पुण्यात असेल आणि त्यांना कुठेही जेवणाची व्यवस्था होत नसेल तर... आम्ही तुम्हाला जेवण देऊ...*


*(आज शनिवारी ५३ लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली.)*


मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साठी महत्वपूर्ण कृती कार्यक्रम आहे...


*कोरोना व्हायरसमुळे* उद्यापासून (दि. २१ मार्च) पुढील काही दिवस शहरातील सर्व खानावळी, हॉटेल्स बंद असणार आहे व जे काही विद्यार्थी त्याच्या गावी जाऊ शकले नाहीत त्यांना (विभागवार) जेवण कुठून मिळणार...? आम्ही देणार...


*'सर्वांना पोटास लावणे आहे...' हा खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा 'शिवविचार' आहे. हाच विचार समोर ठेवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना भोजन देण्याचं कार्य 'महात्मा फुले' आणि राजर्षी शाहू महाराजांनी याच महाराष्ट्राच्या मातीत केले.* त्या काळी साधने उपलब्ध नव्हती परंतु तरीही या महापुरुषांनी एक कृतिशील वाट तुम्हा आम्हा सर्वांसाठी निर्माण केली. आज पुन्हा या वाटेवरून चालण्याची वेळ आली आहे. आपल्या शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्या पालकांच्या गरजू मुला मुलींची जबाबदारी आपण घेऊ यात त्यांच्या पैकी कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही अशी कृतीशील काळजी आपण सर्व घेऊ या... आम्हाला कुणा मुला मुलींचा फोन आला की तो कुठे राहतो हे पाहून त्या भागातील आपल्या कार्यकर्ता, पदाधिकारी यास २ तास आधी कळवले जाईल. *आपण त्यास आपल्या घरातील चटणी भाकरीचा डबा द्यावा...* आरोग्यासाठी आवश्यक सर्व प्रकारची काळजी घेऊन शक्य असल्यास आपल्या बरोबरच पंगतीला जेवायला घेऊन बसावे. *सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.*


चला कृतीशील होऊ या...


*बुडता हे जन, न देखवे डोळा,*
*म्हणुनी कळवळा, येत असे...!* 
- जगद्गुरु संत तुकाराम महाराज 


*आज शनिवारी दि. २१/०३/२०२० रोजी ५३ लोकांची जेवणाची व्यवस्था* संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. *'शिक्रापूर ते निगडी, विमाननगर ते कात्रज आणि शिवाजीनगर ते हडपसर'* या भागातील विद्यार्थी मित्रांना जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी संभाजी ब्रिगेड'चे मंदार बहिरट यांनी परिश्रम घेतले. त्यांच्यासोबत प्रशांत धुमाळ, अतुल ढगे यांनी अमूल्य सहकार्य केले. संतोष शिंदे यांनी मार्गदर्शन केले.


➡️ संपर्क 📞 : 
▪️प्रशांत धुमाळ
   9881402241
▪️संतोष शिंदे
   9850842703
▪️मंदार बहिरट 
   9373320525


- संभाजी ब्रिगेड, पुणे...🚩


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com


मेलवर पाठविणे बंधनकारक*


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image