दिंडी सारस्वतांची

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*दिंडी सारस्वतांची*!
🌞✒️🌞✒️🌞
    आत्मीयता असेल तर घराची *वास्तू* होते,  कर्तृत्ववान असतील तर माणसांचे *महात्मे* होतात आणि साहित्यिक, देशधर्माचे उपासक असतील,तर त्यांच्या वास्तू, शारदेच्या मंदीरा प्रमाणे, शतकानुशतके पूजल्या जातात  ! इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने, मराठी भाषा दिनी, नुकतीच, पुण्यातील अशा वास्तूभेटीची वारी, योजण्यात आली होती.
   आपूलकी असेल तर एखाद्या Event चे रूपांतर सोहळ्यात होते आणि Heritage walk असे रुक्ष नाव न रहाता,प्रासादिकतेमुळे,त्याचे दिंडी मधे रूपांतर होते. गोवींदाग्रज ते कुसुमाग्रज हा वास्तू भेटीचा सोहळा, यामुळेच सारस्वतांची दिंडी ठरला. गडकरी, नाट्यछटाकार दिवाकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, द वा पोतदार, सावरकर, टिळक, आगरकर आणि कुसुमाग्रज, अशा अनेकांच्या वास्तू दर्शनाने, त्यांच्या स्मृती जागवल्या गेल्या.
    पुण्यनगरीत,रोज अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम योजले जातात.सारस्वतांच्या या दिंडीमधे, शंभराहून अधिक आबालवृद्धांचा सहभाग होता. साहित्यिकांच्या  समाजॠणांना उजाळा देणारा,हा कृतज्ञतेचा सोहळा, समरसतापूर्ण आणि नव्या पिढीसाठी, पथदर्शी ठरला.  
नीलफलक आणि त्यावरील नामोल्लेख हा दैनंदिन धकाधकीच्या जीवनात, फुरसतीने आणि इतिहासजमा,असाच विषय असतो. आता मात्र, दिंडीतील प्रत्येक वारकरी, या फलकांकडे,अभिमानाने पाहून,मनोमन ऋण व्यक्त करताना, वंदन करेल,असा विश्वास वाटतो.  
     इतिहासप्रेमी मंडळाचे श्री मोहन शेटे, साहित्यिका डाॅ संगीता बर्वे तसेच अनेक सहयोगी संस्था, मंडळे, या सोहळ्याचे मानकरी आहेत. 
*मंगलमूर्ती मोरया*
🚩🙏🚩🙏🚩
   आनंद सराफ


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*