कर्जत व भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


कर्जत व भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत

कर्जत, दि. 2 गणेश पवार

                              कर्जत-मुंबई या मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर सकाळी कर्जत-भिवपुरी रोड या रेल्वे स्थानका दरम्यान रुळाला तडे गेल्याने प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी सव्वा नऊ ते दहा या वेळेत वाहतूक खंडित झाली होती.मात्र या काळात कोणत्याही प्रकारची मुख्य वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

                            कर्जत येथून सकाळी 9 वाजून 6 मिनिटांनी मुंबई कडे जाण्यासाठी लोकल सुटते.ही उपनगरीय लोकल खोपोली येथून मुंबई सीएसएमटी साठी सोडली जाते.ही लोकल कर्जत रेल्वे स्थानक येथून सव्वा नऊ वाजता मुंबई करिता सोडण्यात आली,पण भिवपुरी रोड येथे येण्यापूर्वी खांब नंबर 96/21 येथे सावरगाव गेट च्या आसपास रेल्वे मार्गावरील रुळाला तडे जाऊन तेथे वेगाने गाडी गेली असती तर अपघात झाला असता.मात्र पावणे नऊ च्या सुमारास पुणे-मुंबई डेक्कन क्वीन ही गाडी धडाडत गेल्यानंतर सावरगाव गेट येथील गेटमन ला रुळाला तडे गेले असल्याचे जाणवले.त्यामुळे त्यांनी त्याबाबत कर्जत रेल्वे स्थानकात त्याबाबत माहिती दिली आणि त्यामुळे खोपोली येथून सुटलेली लोकल कर्जत स्थानकातून सावधरित्या भिवपुरी कडे आली होती.नऊ वाजून 25 मिनिटांनी सावरगाव गेट येथे त्याच लोकल गाडीमध्ये कामगार आले आणि त्यांनी तडे गेलेला रूळ बदलण्याचे काम करून बरोबर 10 वाजून दोन मिनिटांनी ती थांबून राहिलेली लोकल मुंबई करीता रवाना झाली.

                              या कालावधीत कर्जत-मुंबई मार्गावर एकही एक्सप्रेस गाडी जाणार नसल्याने त्याचा कोणताही परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला नाही. त्याचवेळी केवळ कर्जत येथून 9.47ला मुंबई करिता सुटणारी लोकल 15 मिनिटे उशिरा कर्जत येथून सोडण्यात आली तसेच कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस ही देखील 20 मिनिटे उशिराने मुंबई करिता कर्जत स्थानकातून रवाना होण्यात आली.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*