भारताने गुणी अधिकारी गमावला* *-उपमुख्यमंत्री अजित पवार

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


_*उपमुख्यमंत्री कार्यालय,*_
_*मंत्रालय, मुंबई.*_
दि. १८ मार्च २०२०.


*भारताने गुणी अधिकारी गमावला*
*-उपमुख्यमंत्री अजित पवार*
            मुंबई दि. १८: भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे वरीष्ठ अधिकारी तथा साताऱ्याचे सुपुत्र राजेश स्वामी यांच्या निधनाने भारताने एक उमदा, गुणी अधिकारी गमावला असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. 
             शिक्षक दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या राजेश स्वामी हे आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर भारताच्या परराष्ट्र सेवेत (आयएफएस) दाखल झाले होते. सातारा जिल्ह्यातील भुईंज सारख्या छोट्याशा गावात त्यांचे शिक्षण झाले होते. त्यांनी जगभरातील विविध देशात भारताचे राजदूत म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी इजिप्त, थायलंड, केनियात भारताच्या दूतावासात उपउच्चायुक्त म्हणूनही उल्लेखनीय काम केले होते. सध्या त्यांच्याकडे भारतीय परराष्ट्र विभागाच्या दक्षिण आणि पूर्व अफ्रिकेचा कार्यभार होता. किडनीच्या आजाराने तरुण वयातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कर्तुत्ववान सुपुत्र गमावला असल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. 
*****


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*