राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश.. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील “पान टपऱ्या बंद” करण्याचे दिले आदेश...

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


कृपया प्रसिध्दीसाठी


दिनांक :- २०/०३/२०२० 
प्रति,
मा. संपादक साहेब,
दैनिक............ ...


राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश..
जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील “पान टपऱ्या बंद” करण्याचे दिले आदेश...महोदय,
  पिंपरी चिंचवड शहरात ज्या ज्या ठिकाणी “पान टपरी” आहेत, त्या त्या ठिकाणी गोवा, गुटखा, सिगारेट, पान या गोष्टींचे अधिक सेवन करतात त्यामुळे याचठिकाणी अधिकचे धुम्रपान होते. गोवा, गुटखा व पान खाल्ल्यानंतर लोक सर्वत्र ठिकाणी थुंकतात. “कोरोना व्हायरस” हा संसर्गजन्य आजार आहे असे म्हटले जाते. त्यामुळे जर कोणी बाधित असेल किंवा कोणाला काही आजार असेल तर, यामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, धुम्रपान करण्याचे प्रमाणही शहरात जास्त प्रमाणात आहे. काही ठिकाणी तर अधिकृत स्मोकिंग झोन चं आहेत. त्यामुळे त्यातूनही येणाऱ्या धुराद्वारे जो धुम्रपान करत नाही, त्या सामान्य माणसाला देखील संसर्ग होऊ शकतो.
 कोरोना व्हायरसमुळे आपल्या शहरात गेल्या दोन आठवड्यात रुग्णांची संख्या बारा वर पोहचली आहे. त्यात रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड शहरात चित्रपट गृहे, उद्याने, व्यायाम शाळा, शॉपिंग मॉल्स त्याचबरोबर शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्याच धर्तीवर शहरातील पान टपऱ्याही काही दिवस बंद करण्यात याव्यात, कारण शहरात काही नामांकित अशा पान टपऱ्या आहेत तसेच एस.टी स्टॅन्ड, कॉलेजेस याठिकाणी जवळपास ५० - ५० लोकं येऊन गर्दी करतात, त्यामुळे त्याठिकाणी जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून अन्न पुरवठा विभागातर्फे विशेष पथक नेमूण तशी यंत्रणा राबवावी व जे पान टपरी धारक “पान टपरी बंद” करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.
 वरील विषयान्वये राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पाठ पुराव्याला यश आले आहे. वरील निवेदन दिनांक १६ मार्च २०२० रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्तांना दिल्यानंतर ते जिल्हाधिकारी पुणे यांना पत्र पाठविण्यात आले तसेच सततच्या पाठपुराव्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी “पान टपरी बंद” करण्याचा निर्णय माननीय जिल्हाधिकारी यांनी घेतला व त्यांच्या आदेश पत्रातून “पान टपरी बंद” ठेवण्याचे आदेश देण्यात आला.
 सदरची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकांत प्रसिध्दीस दयावी, ही विनंती.
कळावे,
                                                      आपली स्नेहांकित,


                                                                      
कु. वर्षा जगताप
                युवती अध्यक्ष


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*