कोरोना ही राष्ट्रीय आपत्तीच्या  पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी, सेनेपाठोपाठ आता काँग्रेस  आमदार, खासदार ही  एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीला देणार...*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*कोरोना ही राष्ट्रीय आपत्तीच्या  पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी, सेनेपाठोपाठ आता काँग्रेस  आमदार, खासदार ही  एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीला देणार...*


मुंबई |  कोरोनाला पळवून लावण्यासाठी आता निकाराचा लढा सुरू झाला आहे. सरकार पूर्ण ताकदीने त्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये आपलंही योगदान असावं म्हणून सामाजिक संस्था, उद्योगपती, राजकारणी आपापल्या पद्धतीने मदत करत आहे. अशातच राष्ट्रवादी आणि सेनेपाठोपाठ काँग्रेसनेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व आमदारांचा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचं ठरवलं आहे.


कोरोनाचा सामना करण्यासाठी सामाजिक जबाबदारी ओळखून काँग्रेस पक्षाचे आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तर खासदार पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ट्विट करून त्यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
याशिवाय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे या लढ्यात मदत करू इच्छितात त्यांनी आपली मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करावी, असं आवाहन देखील  बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या