लॉकडाऊनमुळे पत्रकारिता आर्थिक संकटात*  *हीच ती वेळ आहे मदतीची*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*लॉकडाऊनमुळे पत्रकारिता आर्थिक संकटात* 


*हीच ती वेळ आहे मदतीची*


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे पत्रकारिता क्षेत्रात प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाले आहे वृत्तपत्र कार्यालयातील कर्मचारी छपाई विभागातील कर्मचारी आणि टेबल वर्किंग वर काम करणाऱ्या पत्रकारांच्या अडचणींमध्ये वाढ निर्माण झाली आहे अनेक वृत्तपत्रे प्रकाशापासून अलिप्त होऊ लागले आहेत तर अनेक वृत्तपत्र आर्थिक संकटात सापडले आहे या राजकारण्यांना याच पत्रकारितेने आतापर्यंत सहकार्य केले त्या राजकारण्यांनी अशा संकटाच्या वेळी पत्रकारांसाठी धावून येणे खूप गरजेचे झाले आहे अनेक वृत्तपत्रांच्या जाहिरात बाक्या अजूनही मिळालेल्या नाहीत बंद अवस्थेत असलेल्या या वृत्तपत्रांच्या कार्यालयात कर्मचारी हताश होऊन पुढे काय करायचे या चिंतेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्यांसाठी जीव तोडून काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाकडून अद्याप तरी कुठलीही मदत जाहीर झालेली नाही उपाशीपोटी राहून पत्रकारितेचे व्रत कसे पूर्ण करणार हाही प्रश्न स्वतः लागला आहे पत्रकारांच्या आर्थिक विवंचनेत मुळे त्याचे अख्खे कुटुंब देखील अडचणीत सापडले आहे अशावेळी राजकारण्यांनी आपल्याकडे असलेल्या आर्थिक बाक्या तात्काळ देऊन पत्रकारिता क्षेत्रात हे योगदान द्यावे शासनाने देखील प्रत्येक पत्रकारास पाच हजार रुपये आणि जीवनावश्यक वस्तू देऊन या संकटातून बाहेर येण्यासाठी धीर द्यावा एवढी माफक अपेक्षा केली जात आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्यांना जाहीर केलेल्या मदतीमध्ये राज्य सरकार कडून पत्रकारांसाठी अशी घोषणा केली तर अशा संकटसमयी यातून पत्रकारांना दिलासा मिळेल मोठमोठ्या वृत्तपत्रांमध्ये काम करत असणाऱ्या लोकांना उपासमारीची वेळ येणार नाही मात्र छोटे वृत्तपत्र आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यावर हे संकट कोसळणार आहे तेव्हा हा राजकारण्यांनी आणि सरकारनेही ही याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी आशा वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांकडून केली जात आहे शहरी भागातच पत्रकारिता आहे असे नाही तर ग्रामीण भागातही पत्रकारांची संख्या अधिक आहे त्याच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी मदतीची खूप गरज निर्माण झाली आहे


       *अमोल सांगानी*
🙏 *जिल्हा उपाध्यक्ष*🙏
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना        


यवतमाळ


Popular posts
४४.६% भारतीय विद्यार्थ्यांची ‘स्कूल फ्रॉम होम’ पर्यायास पसंती: ब्रेनली
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यात  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून अंतिम वर्षाच्या परीक्षा तयारीचा आढावा
Image
HIT DESIGN BACK IN STOCK 
Image
मा. श्री. किशोर शितोळे यांना पुणे प्रवाह कोविड-१९ महायोद्धा2020 PUNE PRAVAH Covid-19 WARRIORS 2020 पुरस्काराचे मानकरी 
Image