🤝🤝✍✍✍
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*शेतकरी आरोग्य जागृती अभियानात सहभागी व्हावे* -- *विठ्ठलराव पवार*
*धुळे* -(प्रतिनिधी)शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय शेतकरी आरोग्य जागृती अभियानात जेष्ठ नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, माताबाल आरोग्य समस्या व व्यसनमुक्ती विषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने सदर जनहितार्थ योजनेचा जास्तीतजास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे ऊस दर नियमक मंडळाचे सन्माननीय सदस्य विठ्ठलराजे पवार यांनी केले. यावेळी खान्देशची कुलदैवत आई एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सोमनाथ गुरव, शेतकरी संघटनेचे खान्देश प्रभारी डॉ गजेंद्र पाटील, अभियान प्रमुख डॉ गणेश जायस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.
शासकीय तथा अशासकीय विविध योजनांची काटेकोर अंमलबजावणी करून शेतकरी आत्महत्या पूर्णपने थांबविने आणि कृषीकन्या यांच्या संरक्षणार्थ प्रत्येकाने कृतिशील सहभाग देणे यासाठी धुळे येथील आई एकविरा देवी मंदिरात विशेष बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी खान्देश दौऱ्यानिमित्त धुळे येथे आलेले शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार पुढे म्हणाले की, कष्टकरी हातमजूर कामगारांचे जीवनमान उंचावन्यासाठी सर्व समावेशक योगदान मिळणे आवश्यक आहे. प्रत्येकाने मानसिक तथा शारीरिक आरोग्याची निगा राखावी त्याचप्रमाणे हिंस्त्रप्राणी, चोर दरोडेखोर, व्यभीचारी लोकांपासून कृषीकन्याच्या संरक्षणास प्राधान्य देण्यात यावे असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शेतकरी आरोग्य जागृती अभियान अंतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथिल डॉ मनोहर डोळे मेडिकल फौंडेशनचे विश्वस्थ डॉ संदीप डोळे, नासिक येथिल डॉ वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या अमृता पवार, धुळे येथिल जवाहर मेडिकल फॉउंडेशन संचालित रुग्णालयाचे मुक्त सेवाकर्मी डॉ गणेश जायस्वाल, जळगाव येथिल सारा हॉस्पिटलचे जनसंपर्क प्रतिनिधी डॉ हनीफ पटेल, नंदुरबार येथिल जी के थेरपीचे संचालक संदीप जायस्वाल आदी मान्यवरांची प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी एकविरा देवी मंदिरचे विश्वस्त सोमनाथ गुरव, माजी सैनिक डॉ भगवान बोरसे, खान्देश प्रभारी डॉ गजेंद्र पाटील, प्रतिष्ठित शेतकरी उमाकांत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रफुल्ल फुलपगारे , अभियंता स्वप्नील चौधरी, डॉ वीरेंद्र गिरासे, डॉ गोपाल चौधरी, जळगाव जिल्हा अध्यक्ष मालती पाटील, डॉ रुपाली पाटील, रचना पाटील, मनीषा वाघ आदीनीं बैठकीचे संयोजन केले.
#######$$$$######
*बातमी जाहिरात आणि अधिक माहितीसाठी संपर्क :/ संपादक संतोष सागवेकर मो.नं. :- 9765202692*