आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली* *राष्ट्रीय विषाणू संस्थेला भेट*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली*
*राष्ट्रीय विषाणू संस्थेला भेट*


पुणे, दि, १८: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. 
   यावेळी संस्थेतील शास्त्रज्ञांबरोबर बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. यावेळी संचालक प्रिया अब्राहम, विभाग प्रमुख वर्षा पोतदार, डाॕ.बसू, डाॕ.सहारा चेरीयन, विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, माजी आरोग्य महासंचालक डाॕ.सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डाॕ.अर्चना पाटील,बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॕ.अजय चंदनवाले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपा अपर आयुक्त रूबल अग्रवाल आदी उपस्थित होते.
000000000