पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*शेतकरी संघटनेचे जिल्हा उपनिबंधकांना बेमुदत घेराव आंदोलन*
दि. ९ मार्च रोजी सकाळी ११.०० वा. लातुर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पोटली,कडता,शॅम्पल च्या नावाखाली शेतकऱ्यांची दररोज करोडो रुपयांची होणारी लूट थांबावी व ज्या बाजार समितीचे संचालक व प्रशासन शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या होत असलेली लूट उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, मात्र ती थांबावी म्हणुन काहीच करीत नाहीत अशा अकार्यक्षम संचालक मंडळ व प्रशासन यांच्यावर कृषी उत्पन्न खरेदी- विक्री अधिनियम १९६३ व नियमन १९६७ च्या तरतुदीनुसार कलम ४० (ई) ची नोटीस काढुन बेकायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधकांना बेमुदत घेराव घालण्याच्या आंदोलनचे निमंत्रण देण्यासाठी कांबळगा ता.शिरुर अनंतपाळ येथे बैठक घेऊन शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले.यावेळी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या अध्यक्षा सिमाताई नरोडे, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, जेष्ठ नेते दगडूसाहेब पडीले, तालुकाध्यक्ष किशनराव शिंदे, निलंगा उपाध्यक्ष गुंडेराव उमाटे आदिंसह गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.