पुणे शहरातील लॉकडाऊन स्थितीत कोणताही बदल नाही. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरूच राहणार आहेत.* ...... सह पोलीस आयुक्त डॉ.  रविंद्र शिसवे*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*फेक न्यूज अलर्ट*
आज (सोमवार, 30 मार्च) दुपारपासून व्हॉटस्अँँपवर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुढचे तीन दिवस शहर बंद राहणार असल्याचे आवाहन करताना पोलीस व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा बंद पुणे शहरातला असल्याचे मेसेजमध्ये सांगितले जात आहे. 1. व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील शाहू पुतळा भागातील आहे; पुणे शहरातील नाही.
2. पुणे शहरातील लॉकडाऊन आज ज्या स्थितीत आहे, त्याच स्थितीत सुरू राहणार आहे. त्यामध्ये बदल नाहीत. 


**सह पोलीस आयुक्त डॉ.  रविंद्र शिसवे* यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनीही हा व्हिडिओ पुण्याशी संबंधित नाही, असा खुलासा केला आहे. *असे फेक मेसेज तयार करून कोणीही पुण्यात घबराट पसरवू नये, पोलीस कारवाई केली जाईल,* असा इशारा डॉ. शिसवे यांनी दिला आहे. 


*पुणे शहरातील लॉकडाऊन स्थितीत कोणताही बदल नाही. जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरूच राहणार आहेत.*