*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
#PRESSNOTE
*सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईनला (एसआयएफटी) गोवा येथे*
*अभिनेते सुनील शेट्टी यांच्या हस्ते 'इंडियाज सिग्नेचर ब्रँड' पुरस्कार प्रदान*
पुणे : गेल्या १० वर्षात विद्यार्थी व प्राध्यापकांनी केलेल्या इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिव्ह कामाची दाखल घेऊन सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फाशीं टेक्नॉलॉजी (एसआयएफटी) महाविद्यालयाला पश्चिम भारतातील नाविन्यपूर्ण आणि क्रयशील फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट म्हणून गौरविण्यात आले. मिशवा प्रॉडक्शन्सच्या वतीने गोवा येथे आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी व गोव्याचे नगरविकास-कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते 'एसआयएफटी'ला 'इंडियाज सिग्नेचर ब्रँड' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या कुलसचिव नूतन जाधव व 'एसआयएफटी'च्या प्रा. मोनिका कर्वे यांनी पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्कार सोहळ्यावेळी अनेक मोठ्या संस्था, कंपन्या, ब्रँड आणि उद्योजकांना संबंधित श्रेणींमध्ये त्यांच्या कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी जयोति विद्यापीठ, महिला विद्यापीठ, फायटर विंग्स एव्हिएशन अकॅडमी, फिन अकॅडमी ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी, स्मार्ट व्हॅल्यू हेल्थ आणि वेलनेस, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग आदी संस्थांना सन्मानित करण्यात आले. फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूटला मिळालेल्या या मनाच्या पुरस्काराबद्दल 'सूर्यदत्ता' संस्थेच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, "संस्थेचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांच्या नेतृत्वात विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वोत्तम दर्जाचे शिक्षण देऊन गुणवत्तेचे एक मानक बनण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 'एसआयएफटी'मध्ये पुणे विद्यापीठाशी संलग्न बीएस्सी इन फँशन डिझाईन, तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्नित डिप्लोमा, अडवान्सड डिप्लोमा आदी कोर्स चालविले जातात. गेल्या १० वर्षात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहेत. अनेकजण मोठमोठ्या पदावर कार्यरत असून, डिझाइन, चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत."
प्रा. रेणुका घोसपुरकर व प्रा. मोनिका कर्वे म्हणाल्या, "डिझाईन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहोत. त्यासाठी पाठ्यक्रमाबरोबरच प्रात्यक्षिक आणि क्षेत्रभेटीवर भर दिला जातो. ला-क्लासे वार्षिक फॅशन शो, स्पार्क प्रदर्शन घेतले जाते. या दहा वर्षात विविध संकल्पनावर हे उपक्रम झाले आहेत. यंदा खादी संकल्पनेवर आधारित प्रदर्शन व फॅशन शो झाला. या प्रदर्शनात एक हजारपेक्षा अधिक खादीच्या वस्तू विद्यार्थ्यांनी बनवल्या होत्या. त्याची नोंद झाली आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी वाढावी, यासाठी समाजातील अनेक महिलांना प्रशिक्षण दिले जाते."
--------------------------------
फोटो ओळ :
*'इंडियाज सिग्नेचर ब्रँड' पुरस्कार अभिनेते सुनील शेट्टी यांच्या हस्ते स्वीकारताना प्रा. नूतन जाधव व प्रा. मोनिका कर्वे*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com
मेलवर पाठविणे बंधनकारक*