स्मार्टफोन चार्ज करताना ‘या’ चुका टाळा*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*       


 



📲 *स्मार्टफोन चार्ज करताना ‘या’ चुका टाळा*


*LetsUp | Special*


🔋 स्मार्टफोनची बॅटरी लवकर उतरण्याची समस्या अनेकांना सतावते. जर आपण काही चुका टाळल्यास फोनची बॅटरी दीर्घकाळ टिकायला नक्कीच मदत होईल. 


💡 *फोन चार्ज करताना या टिप्स नक्की लक्षात ठेवा.*


▪ अनेकांना स्मार्टफोनची बॅटरी पूर्णपणे उतरल्यावर तो चार्ज करण्याची सवय असते. पण असं न करता बॅटरी 20 टक्क्यांवर आली की फोन चार्ज करावा.


▪ अगदी 100 टक्के चार्जिंग केली नाही तरी चालेल पण नेहमी फोन किमान 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ द्यावा.


▪ फोन चार्ज करताना काहीजण त्या मोबाईल कंपनीचा चार्जर न वापरता मिळेल तो चार्जर घेऊन फोन चार्ज करतात. पण असं करणं चुकीचं आहे. 


▪ प्रत्येक फोनची बॅटरी ही वेगवेगळी असते तिला किती ऊर्जा आवश्यक आहे, याचं ठराविक प्रमाण असतं त्यामुळे नेहमीच मोबाईल कंपनीच्या चार्जरने फोन चार्ज करावा.


▪ फोन रात्रभर कधीही चार्ज करत ठेवू नये. जास्तवेळ बॅटरी चार्ज झाल्याने तिची ‘बॅटरी लाईफ’ कमी होते.


▪ पॉवर बँक वापरून फोन चार्ज करतेवेळी कधीही फोनवर बोलू नये, यामुळे फोनचं आतील तापमान वाढतं आणि यामुळे ‘बॅटरी लाईफ’ कमी होण्याची शक्यता अधिक असते.


▪ जर तुम्ही मोबाईल कव्हर वापरत असाल, तर फोन चार्ज करताना मोबाईल कव्हर काढून मग फोन चार्ज करावा.


▪ स्वस्तातले चार्जर फोन चार्ज करण्यासाठी कधीही वापरू नये.


▪ स्वस्तातल्या चार्जरमुळे बॅटरीला अधिक धोका निर्माण होतो आणि बॅटरी लवकर खराब होते.


📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : 


★★★★★★★★★★
*बातम्या जाहिरात आणि अधिक माहितीसाठी संपर्क :- संपादक संतोष सागवेकर.मो.नं. :- 9765202692*