कांदा निर्यातबंदी उठवल्याचे शेतकरी संघटनेकडुन स्वागत.*  _निर्णय कायमस्वरुपी असावा ही अपेक्षा._ -अनिल घनवट

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


कृपया प्रसिद्धीसाठी
मा. संपादक ..............


*कांदा निर्यातबंदी उठवल्याचे शेतकरी संघटनेकडुन स्वागत.*
 _निर्णय कायमस्वरुपी असावा ही अपेक्षा._ -अनिल घनवट


    कांद्याचे दर कोसळत असताना केंद्र शासनाने निर्यातबंदी व निर्यात शुल्क हटविल्याबद्दल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वागत केले आहे.
       कांद्याच्या तुडवड्यामुळे वाढलेले कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने निर्यातबंदी, ८५० डॉलर निर्यात शुल्क लावण्यात आले होते. साठ्यांवरिलमर्यादा २५ क्विंटल पर्यंत घटविण्यात आली होती. शेतकरी संघटनेने वारंवार केंद्र शासनानेकडे हे निर्बंध हटविण्यासाठी पाठपुरावा केला होता. १ मार्च रोजी चांदवड येथे कांदा परिषद घेउन कांदा व्यापार निर्बंधमुक्त करण्याचे ठराव करण्यात आला. 
        निविन कांद्याची मोठ्या प्रम‍णात आवक होत असल्यामुळे सध्या कांद्याचे दर उतरणीला लागले होते. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या दराची घसरण थांबुन २००० रुपये क्विंटल पर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे. कांदा साठवणुक मर्यादे बाबत अद्याप स्पष्ट आदेश नाहीत. साठवणुक मर्यादा हटवली तरच व्यापारी निर्यातीसाठी साठा करू शकतील. निर्यातबंदी व निर्यात शुल्क हटविल्याचे शेतकरी संघटना स्वागत करत आहे परंतू कांदा निर्यात कायमस्वरुपी सुरु राहिली पाहिजे. पुन्हा दर वाढल्यास निर्यातबंदी लागू होण्याची टांगती तलवार निर्यातदार व, व्यापारी व शेतकर्यांवर राहू नये. कांदा साठवणुक व वाहतुक क्षमतेच्या मर्यादा हटविण्या बाबत सर्व राज्य  सरकारांना सुद्धा सुचना देणे अपेक्षित आहे. शेतकरी संघटनेने शेतकर्यांमध्ये केलेल्या जागृतीचे हे फळ आहे. सर्व शेतीमाला वरील नियंत्रणे कायमस्वरुपी हटवावीत यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीला जाउन, शांततेच्या मार्गाने पंतप्रधानांना साकडे घालणार असल्याचे अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.


०३/०३/२०२०


अनिल घनवट
अध्यक्ष शेतकरी संघटना.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*